योगेश वाघमोडे ची राष्ट्रीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड

0
235

जामखेड न्युज——

योगेश वाघमोडे ची राष्ट्रीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड

जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे नुकत्याच राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेत जामखेडच्या वुशू खेळाडूने सुवर्णपदक पटकावले यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेमध्ये ल.ना.होशिंग ज्युनियर कॉलेज, जामखेड चा खेळाडू योगेश वाघमोडे याने सुवर्णपदक मिळवले आहे.

योगेश वाघमोडे याची डिसेंबर मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे. योगेश ने नुकत्याच तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर वुशु स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविलेले होते.

योगेश नवीन मराठी शाळा,जामखेड येथे वुशु जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वुशु खेळाचा सराव करत आहे.

सर्व खेळाडूंचे,जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर साहेब, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार, आमदार प्रा.राम शिंदे, मा.जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात, उमेश देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग, क्रीडा शिक्षक प्रल्हाद साळुंके, धीरज पाटील, राघवेंद्र धंनलंगडे, शाम पंडित, आबा जायगुडे, रोहित थोरात यांच्यासह अनेकांनी हार्दिक अभिनंदन केले व राष्ट्रीय शालेय वुशु स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here