भुमीपुत्र कर्तृत्वाने होतो जन्माने नाही – खासदार डॉ. अमोल कोल्हे कर्जत जामखेड मधील गुंडगिरीचा बंदोबस्त करणारच – रोहित पवार

0
845

जामखेड न्युज——

भुमीपुत्र कर्तृत्वाने होतो जन्माने नाही – खासदार डॉ. अमोल कोल्हे

कर्जत जामखेड मधील गुंडगिरीचा बंदोबस्त करणारच – रोहित पवार

शेजाऱ्याच्या पोराला कधी बिस्किट पुडा देण्याचे माहित नाही तो कसला भुमीपुत्र – खासदार निलेश लंके

मतदानाच्या रूपाने भाजपा सरकारचा चौरंगा करा – भुषणसिंह होळकर

सध्या गेल्या दीड दोन वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघात गुंडगिरीने डोके वर काढले आहे. याचा त्रास सर्व सामान्य जनता, महिला, व्यापारी व व्यावसायिकांना होत आहे. या गुंडगिरीचे समुळ उच्चाटन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आमदार रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत सांगितले.

कर्जत जामखेड ची जनता खुप भाग्यवान आहे कारण रोहित पवारांसारखा विकासाचे व्हिजन असणारा आमदार तुम्हाला मिळाला आहे रोहित पवार हे आता महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांनी त्यांचे कर्तृत्व विकासातून सिद्ध केले आहे. भुमीपुत्र हा कर्तृत्वाने होतो जन्माने नाही असे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर ) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यानंतर जाहीर सभा घेण्यात आली यावेळी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, आमदार नारायण पाटील, राजेंद्र देशमुख, दत्ता वारे, नामदेव राऊत, जामखेड शिवसेना तालुका प्रमुख अँड मयूर डोके, कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव, विजयसिंह गोलेकर, अमोल राळेभात, राजेंद्र कोठारी, संजय वराट, हनुमंत पाटील, सुभाष गुळवे, सुर्यकांत मोरे, शामभाऊ कानगुडे, किरण पाटील, बाळासाहेब साळुंखे, राजेंद्र फाळके, सचिन खरात यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले की, कर्जत जामखेड ची जनता दोन आमदार निवडणार आहेत. एक विधानपरिषदेवर आहेत व दुसरे रोहित पवार आमदार ते मंत्री होणार आहेत. रोहित पवार हे पाच वर्षांत ईडी, सीबीआय, पर्यावरण यांच्या चौकशीमुळे यांनी वयापेक्षा जास्त अनुभव असणारे व तावून सुलाखून निघालेले कोहिनूर हिरा झालेले आहेत.

यावेळी बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, रोहित पवार यांचे सध्या मतदारसंघात नव्हे तर राज्यात वारे आहे या वाऱ्याचे रूपांतर वादळात करा व लाखाचे लीड द्या गर्दी पाहता हिच विजयाची सभा दिसत आहे. भाजपा वाँशिंग मशीन आहे का? आरोप होणारे भाजपात गेले की स्वच्छ होतात सध्याची लाडकी बहिण योजना लाडकी नाही सत्ता लाडकी आहे.

गुंडगिरीचा बंदोबस्त करणार – रोहित पवार

सध्या गेल्या दीड दोन वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघात गुंडगिरीने डोके वर काढले आहे. याचा त्रास सर्व सामान्य जनता, महिला, व्यापारी व व्यावसायिकांना होत आहे. या गुंडगिरीचे समुळ उच्चाटन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आमदार रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत सांगितले.

गर्दी पाहून आजच माझा निश्चित झाला आहे. विरोधक बारा खात्याचे मंत्री असताना काय विकास केला हे सांगावे तसेच ते आमदार झाल्यापासून गुंडगिरी वाढली आहे तीचा बंदोबस्त करणाच, मागील वेळी तरी मागच्या दाराने गेले आता तर निवडणूक निकाल त्यांनी घरीच टिव्ही वर पाहवा त्यांचा मोठा पराभव होणार आहे.
भुमीपुत्रावरून त्यांनी सांगितले की, त्यांच्यात हिम्मत असेल तर मोदी साहेब, चंद्रकांत पाटील यांना विचारावे दुसरीकडे का उभे राहता.

यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले की, आमदार रोहित पवार यांची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. रोहित पवार हे राज्याचे ब्रँड आहेत. जो आपली आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तो खरा भुमीपुत्र असतो. विरोधकांनी कधी शेजारच्या पोराच्या हातात बिस्किट पुडा दिला नाही आणि भुमीपुत्र म्हणून घेतात. कर्जत जामखेड ची जनता रोहित पवार यांच्या रूपाने मंत्र्याला मतदान करणार आहात.
ज्या पोलीसांनी सीआरपीएफ केंद्र उद्घाटन करण्यास अडविले तेच काही दिवसात रोहित पवार यांना सँल्युट करणार आहेत. आणि तुम्हाला निकालादिवशी टिव्ही वर ब्रेकिंग न्यूज मिळणार रोहित पवार सर्वाधिक मताधिक्याने विजयी

भुषणसिंह होळकर यांनी बोलताना सांगितले की, भाजपा सरकारचे अच्छे दिन आले नाहीत. आरक्षण मिळाले नाही. या भ्रष्टाचारी सरकारचा मतदानाच्या रूपाने चौरंगा करा असे आव्हान केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here