पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचा उद्या होणार कृषी मंत्र्याच्या हस्ते लोकार्पण सोहळा

0
785

जामखेड न्युज——

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचा उद्या होणार कृषी मंत्र्याच्या हस्ते लोकार्पण सोहळा

 

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा उद्या रविवारी दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांच्याच पुढाकारातून जामखेड तालुक्यातील हळगाव येथे 100 एकर जागेत 65 कोटी रूपये खर्चाच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय पुर्णत्वास आले आहे याचा लोकार्पण सोहळा उद्या दुपारी 1.30 वाजता होत आहे.

महाविद्यालयाचे काम पुर्ण होऊन गेल्या वर्षीपासून हळगाव येथे कृषि महाविद्यालयाचे वर्ग नियमितपणे भरवले जाऊ लागले आहे. मात्र पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हे नवीन असल्यामुळे या ठिकाणी अनेक मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना याबाबत निवेदन देऊन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. 

त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते की, आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून हळगाव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरच सुटणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

उद्या रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. राम शिंदे, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महाविद्यालयास ६० विद्यार्थी संख्या मंजूर असून, ६५ शिक्षक व ३७ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १०१ पदे मंजूर आहेत.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील हाळगाव (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय जिल्ह्यातील दुसरे शासकीय महाविद्यालय आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतीखालील क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे कृषी विकासाला चालना मिळण्याबरोबरच स्वयंरोजगार आधारित कुटीर उद्योग उभे करण्यासाठी स्थानिक पातळीवर मनुष्यबळ निर्माण होईल. त्याचप्रमाणे या भागातील शेतकऱ्यांना कृषी सेवा व सल्ला उपलब्ध होऊन शेतीचे उत्पादन वाढण्यास देखील मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here