जामखेड न्युज——
हिंदूनी जातीभेद विसरून एक व्हावे – पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव
हिंदूंनी जातीभेद विसरून एक व्हावे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संघ मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती अभियान राबविणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने विजयादशमीच्या उत्सवानिमित्त शुक्रवारी जामखेड शहरातील नवीन नगरपरिषद कार्यालयापासून सविंधान चौक, मेन रोड जयहिंद चौक, बीड रोड, मिलिंद नगर, तपनेश्वर रोड, खर्डा चौक, ते महावीर भवन असे भव्य संचलन करण्यात आले यावेळी ठिक ठिकाणी संचलनाची पाहणी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी केली. यानंतर महावीर भवन येथे सांगता कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साकत येथील साकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय काळे होते.
यावेळी सहतालुका कार्यवाहक बाळासाहेब दळवी, विवेक कुलकर्णी, ज्ञानेश्वर अंदुरे, डॉ.भगवान मुरुमकर, सोमनाथ पाचारणे, मनोज कुलकर्णी, अमित चिंतामणी , संजय काशीद , शरद कार्ले, प्रवीण बोलभट उमेश देशमुख राजेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले, संघात विजयादशमी हिंदू साम्राज्य दिन गुरू पुजन रक्षाबंधन मकरसंक्रांत हे उत्सव साजरे केले जातात विजयादशमीला पौराणिक महत्त्व आहे सिमोल्लंघन म्हणजे अनुकूल बदल करावे लागतात या तपश्चर्या करावी लागते आज सामाजिक काम करतांना मेहनत करावी आपल्या देवदेवतांच्या हातात शस्त्र आहे त्यामुळे आपण शस्त्रांचे पुजन करतो परंतु आपण एका अर्थाने शस्त्र विसरून चाललो आहे काळानुरूप शञुवर मात करण्यासाठी शस्त्रात बदल करत आहे आपल्यावर दुसर्याने आक्रमक केल्यास सहन करता कामा नये आज दहशतवाद आतंकवाद हे असुर आहेत या वर विजय मिळविला आहे.
यासाठी समाजाने पाठिंबा दिला पाहिजे
हिंदू समाज जागृत करण्यासाठी शाखेत आले पाहिजे यासाठी गावोगावी शाखांचा कायँ विस्तार झाला पाहिजे यासाठी स्वयंसेवक तयार झाले पाहिजे समाजात वैचारीक सामाजिक धार्मिक या सज्जन शक्ती काम करत आहेत त्यांना एकञ करून परिवर्तन करू शकतो यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न केले पाहिजेत आज समाजात निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी प्रबोधन केले जावे हेच खरे राष्ट्रीय काम आहे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही आहे असे जाधव यांनी सांगितले.
यावेळी काळे यांनी सांगितले की जात भिन्न रहित देश व्हावा राष्ट्र हितासाठी सर्वानी एकञ येऊन देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वानी एकञ यावे असे आवाहन केले.