प्रा. सचिन गायवळ यांच्या हस्ते विविध ठिकाणी देवींची आरती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उस्फुर्त स्वागत.

0
317

जामखेड न्युज——

प्रा. सचिन गायवळ यांच्या हस्ते विविध ठिकाणी देवींची आरती

मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उस्फुर्त स्वागत.

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही सामाजिक व धार्मिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ हे नवरात्रोत्सवा निमित्त खर्डा दैऱ्यावर आले असताना यांच्या हस्ते खर्डा शहरासह संपूर्ण गटात विविध ठिकाणी देवीची आरती करण्यात आली तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, खर्डा येथे सालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी खर्डा शहरात शारदीय नवरात्र उत्सव विविध, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मांढरदेवी नवरात्र उत्सव भुम रोड येथील मंडळास भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी मंडळाचे कार्यकर्त्यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले.

तसेच चौंडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ कोष्टी गल्ली, खडकपुरा नवरात्र उत्सव मंडळ,त्याचबरोबर संघर्ष नवजीवन नवरात्र उत्सव मंडळ कमिटी चौक याही नवरात्र उत्सव मंडळाला त्यांनी भेटी दिल्या व देवीच्या आरती सुद्धा त्यांच्या हाताने करण्यात आली.

येथील नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही सचिन सर यांचे स्वागत केले. प्रा. सचिन सर गायवळ हे सामाजिक कामाच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक नवरात्र उत्सव मंडळाच्या मंडळाला देणगीच्या स्वरूपात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.

तसेच धार्मिक कामात सुद्धा अन्नदान ही ते सातत्याने करतात, त्यांना मानणारा तरुण वर्ग खर्डा शहरात मोठ्या प्रमाणात आहे.

ते आई तुळजा भवानीचे भक्त असल्याने दरवर्षी नऊ दिवसांचे उपवास धरून नवरात्र उत्सव मंडळाला आर्थिक स्वरूपात मदत करीत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here