माहूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाच्या अपघातात नगर जिल्ह्यातील पती पत्नी ठार, आठ जण जखमी

0
1369

जामखेड न्युज——

माहूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाच्या अपघातात नगर जिल्ह्यातील पती पत्नी ठार, आठ जण जखमी

 

 

नगर जिल्ह्यातील राहुरी येथून माहुरगडला दर्शनासाठी माहूरला जाणाऱ्या भाविकांची भरधाव चारचाकी झाडावर आदळली. यात पती-पत्नी ठार झाले, ८ भाविक जखमी झाले आहे. ही घटना खंडाळा पोलिस ठाणे हद्दीतील सत्तरमाळ घाटात सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. बबन किसन गुलदगड (वय ५५), मनीषा बबन गुलदगड (वय ५०, रा. राहुरी) अशी मृतांची नावे आहेत.

मुकिंदा दतात्रय लांडे (वय ४९), मयुर सुरेश रेकुळे (वय २५), सारिका गौरव सुडके (वय ४०), मंदा राजू गडकर (वय ६०), सार्थक संदीप बोर्डे (वय १३), संदीप बोर्डे (वय ४०), सागर सरोदे (वय २५) आणि किरण बोर्डे (वय ३४ सर्व रा. अहिल्यानगर) अशी जखमींची नावे आहेत.

राहुरीतील बबन गुलदगड, मनिषा गुलदगड, सारिका सुडके, प्रणव सुडके, राहणार तनपुरेवाडी रोड, मयूर रेकुळे, मंदाबाई गटकळ, राहणार बुरुड गल्ली, सागर हरि सरोदे, किरण जगधने, राहणार लक्ष्मीनगर हे भाविक माहूरला जाण्यासाठी तवेरा कारने (एमएच-१६ -एजे- ६०१०) निघाले होते.

 

पुसद – वाशीम मार्गावरील सत्तरमाळ घाटातून तवेरा कार वाशीममार्गे पुसदकडे येताना चालकाला डुलकी लागल्याने ते वाहन सागाच्या झाडावर आदळल्याने अपघात झाला. यात गुलदगड दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर ८ भाविक गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी वाहन चालक- मालक मुकुंद लांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जखमींना वाशीम येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर दोघांचे मृतदेह पुसद येथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवले. 

याबाबतचा पुढील तपास खंडाळा पोलिस करीत आहे.” अपघाताची माहिती मिळताच मयत तसेच जखमी भाविकांचे नातेवाईक व मित्रमंडळी घटनास्थळावर रवाना झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here