जामखेड न्युज——
जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन डॉक्टर व रूग्णांच्या हितासाठी काम करणार – अध्यक्ष डॉ. संजय राऊत
असोसिएशनची कार्यकारणी जाहीर
जामखेड येथील तत्कालीन प्रथितयश डॉ. डी. बी. खैरनार व डॉ. रजनीकांत आरोळे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. संजय राऊत तर उपाध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. मनीषा राळेभात, डॉ. अनिल गायकवाड, सेक्रेटरीपदी डॉ. पांडुरंग सानप, खजिनदारपदी डॉ. विद्या काशीद, कार्यकारणी सदस्यपदी डॉ. प्रकाश खैरनार, डॉ. संजय भोरे,डॉ. अविनाश पवार डॉ. प्रताप चौरे , डॉ. युवराज खराडे, सहसचिवपदी डॉ. अशोक बांगर, अशी तेरा सभासदांची कार्यकारणी काल दि. ४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. या संघटनेत एकूण १६२ सभासद असून यामध्ये शहरी व ग्रामीण डॉक्टरांचाही समावेश आहे. या संघटनेचे कार्यक्षेत्र जामखेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय राऊत यांनी संघटनेची ध्येय धोरण याबाबत माहिती देताना सांगितले की, ही संघटना आगामी काळात डॉक्टरांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत असताना त्यांच्या आरोग्यबाबत असलेल्या समस्या व सामाजिक उपक्रम म्हणून सर्व रोगनिदान त्यांच्यासाठी नेत्रदान, रक्तदान, अवयवदान शिबीरं, विकलांग विद्यार्थी यांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी प्रशिक्षण, तसेच पर्यावरणाबाबत प्रभावीपणे जनजागृती, संघटनेतील सभासदांच्या कुटुंबासाठी विशेष कार्य करणार आहे.
जसे की, या सभासदांच्या मुलांसाठी वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षणामध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मानसन्मान. अशा विविध गोष्टींवर काम करणार आहे. तसेच या संघटनेच्या वतीने एक समन्वय समिती स्थापन करून जामखेड तालुक्यात कोणत्याही हॉस्पिटलकडून रुग्णांना होणारा त्रास किंवा त्यांची होणारी लूट यावर समन्वय साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे.
काल दि. ४ ऑक्टोबर रोजी जामखेड येथील एका हॉलवर झालेल्या छोट्या खाणी कार्यक्रमात जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी डॉ.कुंडलिक अवसरे यांचा मुलगा अथर्व याची एमबीबीएस साठी झालेल्या निवडीबद्दल त्याचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. शेवटी संघटनेचे कार्यकारणी सदस्य डॉ. संजय भोरे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी संघटनेतील सभासद महिला डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना सुरुची भोजन देण्यात आले.
जामखेड येथील तत्कालीन प्रथितयश डॉ. डी. बी. खैरनार व डॉ. रजनीकांत आरोळे यांनी १९८७ सालीच जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची मुहूर्तमेढ रोवली होती. तेंव्हापासून ही संघटना समन्वयाने काम करत होती. काही वर्षांपूर्वी संघटनेच्या अध्यक्षांची निवड सर्वांनुमते केली जात होती. त्यानंतर अलिकडील काही वर्षांपासून निवडणूकीव्दारे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली.
त्यानुसार डॉ. संजय राऊत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर संघटनेत झालेल्या बेबनावानंतर काही सभासदांनी दुसऱ्या संघटनेची स्थापना केली व ते जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मधुन बाहेर पडले. त्यामुळे या संघटनेने अध्यक्ष डॉ संजय राऊत व सर्व सभासदांनी चर्चा विनिमय करून जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची नोंदणी केली. व त्यानुसार काल दि. ४ ऑक्टोबर रोजी जामखेड येथे पत्रकार परिषद घेऊन कार्यकारणी व ध्येय धोरणे जाहिर करण्यात आली.
काल निवड करण्यात आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. डॉ चंद्रकांत मोरे, डॉ. सरफराज खान डॉ. तानाजी राळेभात, डॉ. सुनील कटारिया, डॉ. गणेश झगडे, डॉ. अर्चना झगडे, डॉ. भारती मोरे, डॉ. मनीषा अवसरे , डॉ. मनीषा राळेभात, डॉ. मनीषा पवार, डॉ. प्रशांत वारे डॉ. सागर शिंदे , डॉ. शितल कुडके , डॉ.मेघराज चकोर, डॉ. गफार शेख, डॉ. अविनाश पवार, डॉ बाळासाहेब मुळीक,डॉ राजकुमार सानप यांच्या सह मोठ्या प्रमाणात डॉक्टर उपस्थित होते.