अजितदादांच्या स्वभावाचा ‘तो’ गुण सांगत रोहित पवारांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

0
312
जामखेड न्युज – – – – 
        राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आज वाढदिवस… त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय… त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार  यांनीही अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…. अजितदादांच्या स्वभावाचा खास गुण सांगत आपल्या काकांचं त्यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलंय…
काकांच्या वाढदिवसाला पुतण्याची खास पोस्ट
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास इन्स्टाग्राम पोस्ट लिहिलीय. अजित पवार यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करत त्यांनी दादांविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांचा स्वभाव गुण सांगत दिलेल्या शब्दाला जागणारे, उत्तम प्रशासक आणि कामातही दादा असणारे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादांना निरोगी आणि दुर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना या पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी केली आहे.
अजितदादांच्या कार्यशैलीचं रोहित पवारांना अप्रुप
अजित पवार यांच्यावर कुणी टीका केली वा त्यांच्या कामासंबंधी कुणी काही बोललं तर रोहित पवार त्या त्या वेळी संबंधितांना उत्तर देतात. अजित पवार यांच्या कामाच्या धडाक्याचं रोहित पवार यांना विशेष कौतुक आहे. अजितदादांच्या कार्यशैलीचं रोहित पवार यांना अप्रुप वाटतं. कित्येकदा रोहित पवार आपल्या भावना बोलूनही दाखवत असतात. आज अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रोहित पवारांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.
सुप्रिया सुळे यांच्याकडूनही दादांना शुभेच्छा
राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनीही बंधुरायाला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशात प्रगतीची नवे शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सदैव सज्ज आहे. आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here