जामखेड न्युज – – –
जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लगतच्या नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात *6,310* क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गा मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात मान्सून कालावधीत प्रथमच पाणी सोडण्यात आल्याने कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदी लगतच्या गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.