कर्जत-जामखेडच्या सरकारी कार्यालयांमध्ये मिळणार स्वच्छ आणि थंड व गरम पाणी

0
235
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
कर्जत-जामखेड मधील प्रशासकीय कार्यालयांसाठी आमदार रोहित पवार यांच्या स्थानिक विकास निधितून वॉटर कूलर कम फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार असून त्यांना स्वच्छ आणि थंड व गरम पाणी उपलब्ध होणार आहे.
कर्जत-जामखेडमधील प्रशासकीय कार्यालयांमध्ये यापूर्वी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कायमच घरून अथवा विकत पिण्याचे पाणी आणावे लागत होते. तालुक्याच्या विविध भागातून कामासाठी आलेल्या नागरिकांची सरकारी कार्यालयात कायमच वर्दळ असते. या लोकांचीही पिण्याच्या पाण्याबाबत मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात आल्याने आमदार रोहित पवार यांनी आमदार निधीतून कर्जत-जामखेडमधील प्रशासकीय कार्यालयांसाठी वॉटर कूलर कम फिल्टर उपलब्ध करून दिले आहेत. कर्जत तालुक्यातील पाच तर जामखेड तालुक्यातील सहा प्रशासकीय कार्यालयांना हे वॉटर कूलर कम फिल्टर देण्यात येतील. याचे वैशिष्ट म्हणजे यातून शुद्ध आणि आवश्यकतेनुसार गरम व थंड पाणी उपलब्ध होते. यामुळे प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे पाणी मिळेल आणि हे पाणी शुद्ध असल्याने लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल.
आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘माझे कार्यालय सुंदर कार्यालय’ या उपक्रमाअंतर्गत दोन्ही तालुक्यातील शासकीय कार्यालयांची रंगरंगोटी करणे, तिथे गार्डन विकसित करणे ही कामेही आमदारांच्या संकल्पनेतूनच सुरू असून काही कार्यालयातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जुनाट आणि कोंदट असलेल्या सरकारी कार्यालयांचा कायापालट होऊन त्यांचे सौंदर्य चांगलेच खुलले आहे. पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर प्रशासकीय यंत्रणाही सक्षम असावी लागते, त्यांना आवश्यक साधनेही पुरवावी लागतात, प्रसन्न वातावरण असावे लागते. त्यादृष्टीने मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण करण्याचा आमदार रोहित पवार यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या या कामाचे जनतेसोबच प्रशासकीय वर्गातूनही विशेष कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here