विद्यार्थ्यांसाठी मोठा भाऊ म्हणून सतत पाठिशी – आमदार रोहित पवार श्री नागेश संकुलात कर्मवीर जयंती साजरी.

0
430

जामखेड न्युज——

विद्यार्थ्यांसाठी मोठा भाऊ म्हणून सतत पाठिशी – आमदार रोहित पवार

श्री नागेश संकुलात कर्मवीर जयंती साजरी.

 

विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीसाठी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे.
आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी शिक्षक आणि समाजाकडून मिळालेले ज्ञान याचा योग्य वापर करून जीवनात यशस्वी व्हावे नागेश संकुलात मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून भव्य दिव्य सांस्कृतिक सभागृह उभारून पुढील कर्मवीर जयंती त्यामध्ये साजरी करू असे बोलताना ते म्हटले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य व कर्जत जामखेड लोकप्रिय आमदार आमदार रोहित( दादा )पवार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, रयत बँकेचे संचालक व्याख्याते प्रशांत खामकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ( रा कॉ शरद पवार गट) राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जेष्ठ नेते दत्तात्रय वारे, संचालक सुधीर राळेभात, वैजीनाथ पोले, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे , रा कॉ युवक अध्यक्ष प्रशांत काका राळेभात,वैजीनाथ पोले, बापूसाहेब कार्ले ,

 

शिवनेरीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे, शिवाजीराव ढाळे, सागर कोल्हे, कुंडल राळेभात, सचिन शिंदे , उमर कुरेशी, प्रवीण उगले,संतोष ससाणे, प्रा कैलास वायकर,विनोद सासवडकर, रघुनाथ मोहळकर, साळुंके बी एस, शिक्षक सेल सचिव शिंदे बी एस, एनसीसीचे मयुर भोसले, मोहन यादव, सुग्रीव ठाकरे ,राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, रामहरी गोपाळघरे, अशोक पठाडे, मंगेश दादा आजबे, प्रकाश काळे, सिद्धेश्वर लटके, कृष्णाराजे चव्हाण,प्रश्नात वारे,अमोल गिरमे, कुंडलिक राळेभात, नय्यूम शेख, भारत काकडे, दत्ता डिसले, संतोष शिंदे, महेंद्र राळेभात, महेश राळेभात, काकासाहेब कोल्हे नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये चिकाटी ठेवून आई-वडिलांचे नाव उंचवावे. कर्मवीरांच्या विचाराप्रमाणेच आपण स्वावलंबी बनावे. असे मनोगत व्यक्त केले.

लेझीम झांज पथकाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मूर्ती पूजनाने झाली.

स्वागत गीत संतोष पवार, निलेश अनारसे व विद्यार्थिनी यांनी उत्कृष्ट सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मडके बीके यांनी केले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये चिकाटी ठेवून आई-वडिलांचे नाव उंचवावे. कर्मवीरांच्या विचाराप्रमाणेच आपण स्वावलंबी बनावे.असे मनोगत व्यक्त केले

प्रसिद्ध व्याख्याते प्रशांत खामकर यांनी कर्मवीरांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला व अनेक ऐतिहासिक घडामोडींचे प्रसंग उभारून कर्मवीर अण्णांची माहिती दिली.
विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी नागेश संकुलाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले व कर्मवीर जयंतीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शेवटी विद्यार्थ्यांबरोबर आमदार रोहित पवार यांनी लेझीम झांज चा ठेका धरला .

सूत्रसंचालन संभाजी इंगळे व अभंग मॅडम तर आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here