साकत घाटात सहा महिन्यात पाचव्यांदा ट्रक पलटी, घाट रूंदीकरण करण्याची मागणी

0
1087

जामखेड न्युज——

साकत घाटात सहा महिन्यात पाचव्यांदा ट्रक पलटी, घाट रूंदीकरण करण्याची मागणी

 

जामखेड सौताडा महामार्गाचे गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. पुलाचे काम व खराब रस्ता यामुळे वाहने साकत मार्गी ये जा करतात. रात्री पुणे येथील परळीला चाललेली बल्कची मोकळी बल्गर गाडी रात्री दोन च्या आसपास वळणावर टर्न न बसल्याने पलटी झाला सुदैवाने जीवीत हानी झाली नाही ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरात लवकर घाटाचे रूंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुण्याहून परळी येथे बल्क भरण्यासाठी बल्गर गाडी एम एच 44 यु 3427 चालली होती. चालक श्रीकांत मुंडे तर बरोबर गणेश वायबसे होते रात्री दोन वाजता खालील वळणावर गाडी वर येत असताना वळण न बसल्याने परत खाली वळला व वरून खाली येत पलटी झाली. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरात लवकर घाटाचे रूंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही यातून नेहमीच अपघात होतात.

सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे.

एका वर्षात साकत घाटात दहा ते बारा अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे.

सध्या सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच साकत फाटा ते धोत्री पर्यंत रस्त्यावर अनेक झाडांचे फाटे रस्त्यावर आलेली आहेत. त्याची छाटणी करावी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आशी मागणी हरीभाऊ पोपट मुरूमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here