जामखेड न्युज——
यंदा सावड फेडून वाजत गाजत बारामतीत जाऊन सत्कार घ्यायचाच – आमदार प्रा. राम शिंदे
रोहित पवार यांनी गायवळ कुटुंबियांबरोबरच इतर अनेक कुटुंबियांना खुप त्रास दिला – प्रा. सचिन गायवळ
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार रोहित पवार विजयी झाले होते. त्यांचा चोंडी येथे घरी सत्कार केला होता. आता आपण प्रचंड मतांनी विजयी होऊन वाजत गाजत बारामतीत जाऊन सत्कार घेऊ व सावड फेडू असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
कर्जत जामखेड मतदारसंघातील पुणे परिसरात कामधंदा, नोकरी व व्यावसायानिमित्त स्थायिक झालेल्या भुमीपुत्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, काकासाहेब तापकीर, संचालक अंबादास पिसाळ, मा. सभापती डॉ भगवान मुरुमकर, पै प्रविन दादा घुले, युवामोर्चा उपाध्यक्ष महादेव ओंमासे, विनोद दळवी, राहुल गांगर्डे , राहुल पाटील, धामनगाव चे सरपंच महारुद्र महारनवर, वाकीचे सरपंच नाना वायकर, जवळ्याचे सरपंच सुशिल आव्हाड, उप सरपंच प्रशांत शिंदे, शिवाजी भिसे, पांडुरंग माने गणेश पालवे सह कर्जत जामखेड चे भुमीपुत्र उदयोजक ,नौकरदार, व्यावसायिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. सचिन गायवळ म्हणाले की, आम्ही मागील निवडणुकीत आमदार शिंदे साहेबांबरोबर नव्हतो. आमदार रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी खुप प्रयत्न केले. पण याची जाणीव त्यांना नाही. रोहित पवार यांनी गायवळ कुटुंबियांबरोबरच इतर अनेक कुटुंबीयांना खुप त्रास दिला आहे. आमदार शिंदे यांच्या विरोधात काम करूणही त्यांनी त्रास दिला नाही मात्र रोहित पवार यांनी खुप त्रास दिला आता आपल्याला आपल्या भुमीपुत्रांला साथ देण्याची वेळ आली आहे असे प्रा. सचिन गायवळ यांनी सांगितले.