जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळकरवस्ती येथे पालक मेळावा संपन्न तहसीलदार यांच्या कडून आईच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी 5500 रुपयांची भेट वनरक्षक दिपाली मोहळकरचा सत्कार

0
462

जामखेड न्युज——

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळकरवस्ती येथे पालक मेळावा संपन्न

तहसीलदार यांच्या कडून आईच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी 5500 रुपयांची भेट

वनरक्षक दिपाली मोहळकरचा सत्कार

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहळकरवस्ती मध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यात तहसीलदार महेश कौतिकराव पवार यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त शाळेस 5500 रूपयांची भेट दिली तसेच जिद्द चिकाटी व मेहणतीवर वनरक्षक पदी नियुक्त झालेल्या दिपाली मोहळकरचा सत्कार करण्यात आला.

पालक मेळाव्याचा उद्देश प्रास्ताविकातून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.भीमा बोरुडे मॅडम यांनी समजावून सांगत सर्वांचे स्वागत केले. पालक सभेच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.राजेश मोहळकर ,उपाध्यक्षपदी सौ.भाग्यश्री शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

मा.श्री.महेश कौतिकराव पवार साहेब तहसीलदार यांनी आपल्या आई श्रीम.रजनी कौतिकराव पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला 5500/- रोख रक्कम दिलेली होती.त्या रक्कमेतून विद्यार्थ्यांना लेझीम, पुस्तके,खेळाचे साहित्य खरेदी करून शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.

 

याप्रसंगी कु. दिपाली बाळू मोहळकर हिची वनरक्षक पदी निवड झाल्याबद्दल दिपाली व तिच्या वडिलांचा सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सत्कार केला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवरसुद्धा जिद्द व सकारात्मक विचारांनी मात करता येते असे प्रतिपादन नवनियुक्त वनरक्षक कु.दिपाली मोहळकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

याप्रसंगी पालक सभेसाठी श्री.गोरख मोहळकर श्री.संतोष मेहेर श्री.रणजीत मोहळकर श्री.लक्ष्मण मोहळकर श्री.युवराज मेहेर श्री. बाबुराव शितोळे, श्री.अंबादास मोहळकर श्री.गणेश मोरे श्री.नवनाथ मोहळकर श्री.अंगद मोहळकर श्री. अशोक मोहळकर श्री.राजू मेहेर श्री.अमोल शितोळे श्री.नवनाथ मोहळकर श्री.राऊत सौ.भाग्यश्री शिंदे उपस्थित होते. श्री.प्रशांत कुंभार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here