जामखेड न्युज——
विद्युत पंप चोरणारी टोळी मुद्देमालासह पोलिसांकडून जेरबंद
खर्डा पोलिसांची दमदार कामगिरी
शेतातील पाणी उपसा करण्याचे सिंचन पंप चोरी करणारी टोळी मुद्देमालासह खर्डा पोलीस स्टेशन कडुन जेरबंद 2 आरोपी अटक. 04 मोटर्स (सिंचन पंप)व मोटरसायकल सह एकुण 38,000/- रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दल खर्डा पोलीसांच्या दमदार कामगिरी बद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
तालुक्यातील नायगाव येथे अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी अनेक दिवसांपासून चोरी जात होत्या यामुळे शेतकरी हैराण होते मोटारी चोरणाऱ्या टोळी अल्पवयीन मुलांचा चोरी करण्यासाठी वापर करत होती. आता टोळी जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतक-याच्या शेतातील पाणी उपसा सिंचन पंप चोरी गेलेबाबत तक्रार प्राप्त झाल्याने खर्डा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजि नं 134/2024 भारतीय न्याससहिता 2023 चे कलम 303 (2) , 3 ( 5 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदिप धामणे, पोलीस काँन्स्टेबल प्रविण थोरात, पोलीस काँन्स्टेबल गणेश बडे, असे करत असताना पोलीस काँन्स्टेबल प्रविण थोरात यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली यानुसार तपासाची चक्रे फिरवली व आरोपीचा तपास लावला.