जामखेड न्युज——
प्रशिक्षक बबलू टेकाळे यांच्या वतीने मर्दानी खेळांची माहिती व प्रात्यक्षिकांची कार्यशाळा खर्डा इंग्लिश स्कूल विद्यालयात संपन्न
संतोष (बबलू वस्ताद) टेकाळे संस्थापक श्री. शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था जामखेड, यांचे आज मर्दानी खेळ व आजचा विद्यार्थी तसेच मल्लखांब, योगासने, भारतीय पारंपरिक खेळ यावर माहिती व त्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिके आज रयत शिक्षण संस्थेच्या, खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयात झाले.
श्री.बबलू टेकाळे यांनी गुरुकुल उपक्रमा अंतर्गत आमच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मर्दानी खेळ काय असतात, तसेच मर्दानी खेळाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व, व्यायामाचे महत्त्व, योगासनांचे महत्त्व तसेच आज विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम घडण्यासाठी, कशाप्रकारे संस्कार आत्मसात करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. बबलू टेकाळे यांनी भारतीय संस्कृती व मर्दानी खेळाचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.आपण शिक्षण घेतो त्याचा उपयोग काय करावा, जर आपल्याकडे संस्कार नसतील तर काय होईल यावर ही त्यांनी प्रकाश टाकला.
जात-पात, धर्म , पंथ याला तिलांजली देवून आरोग्यमय संस्कार कसे घ्यावे याचे मार्गदर्शन त्यांनी केले. व्यायाम व मैदानी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांनी विविध मर्दानी खेळ शिकून प्रशिक्षक म्हणून काम करू शकता.
मल्लखांब हा खेळ ऑलिम्पिक साठी अधिकृत झाला आहे, तसेच मल्लखांब हा खेळ खेलो इंडिया मध्ये ही अंतर्भूत आहे याविषयी मार्गदर्शन केले. खेळाडूंना मिळणाऱ्या शासकीय सवलती, किशोरवयीन तसेच तरुण मुलांनी व्यायाम करण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यशाळेचे आयोजन श्री शरद शिरसाट यांनी केले तसेच कार्यशाळेसाठी विद्यालयातील गुरुकुल चे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.