यावेळी मागच्या नाही तर पुढच्याच दाराने एंट्री करणार – आमदार प्रा. राम शिंदे लाडक्या बहिणीचा पगार तीन हजार करणार

0
983

जामखेड न्युज——

यावेळी मागच्या नाही तर पुढच्याच दाराने एंट्री करणार – आमदार प्रा. राम शिंदे

लाडक्या बहिणीचा पगार तीन हजार करणार

 

यावेळी मागच्या दाराने नको मला पुढच्या दाराने एंट्री द्या येणारी विधानसभा निवडण लढविण्याचे संकेत आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिले. गोरगरीब कष्टकरी व सन्मानाने जगणाऱ्या महिलांना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.

विरोधक ही योजना बंद करण्यासाठी सावत्र भाऊ म्हणून कोर्टात गेले आहेत ही योजना टिकणार नाही अशा खोट्या अफवा पसरवत आहे, त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा असे वक्तव्य आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मान नात्याचा भाऊ बहिणींचा रक्षाबंधन मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या पहिल्या व दुसरा हप्ता जमा झाल्याबद्दल लाडक्या बहिणीच्या रक्षाबंधनाच्या सोहळ्यात आमदार राम शिंदे बोलत होते.

मी खात्रीपूर्वक सांगतो उद्याच्या काळात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही तीन हजार रुपये महिना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारच्या काळात रेशन दुकानावर मोफत धान्य, महिलांना वर्षात तीन मोफत सिलेंडर, आनंदाचा शिधा देण्याचे काम या लाडक्या सरकारने केले आहे, यावेळी मागच्या दाराने नको मला पुढच्या दाराने एंट्री द्या, १५०० रुपयांचा पगार ३००० केल्याशिवाय मी थांबणार नाही” असे मत आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम संपल्यानंतर सर्व महिलांची भोजन व्यवस्था केली होती, त्यानंतर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊबीज ओवाळणी म्हणून उपस्थित महिलांना आमदार राम शिंदे मित्र मंडळाच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, सरपंच संजविनी पाटील, सचिन गायवळ,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले
भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवान मुरूमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, नंदू गोरे, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, तरडगावचे सरपंच जयराम खोत, पांडुरंग उबाळे,

भागवत सुरवसे, नानासाहेब गोपाळघरे, सोनेगावचे सरपंच डॉ.विशाल वायकर, महारुद्र महारनवर, अँड सुभाष जायभाय, उध्दव हुलगुंडे, सोनाजी सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य महेश दिंडोरे,रुद्रा मुंडे, डॉक्टर सोपान गोपाळघरे, राजू मोरे, धीरज कसबे, सातेफळचे सरपंच गणेश लटके, बबलू सुरवसे, केशव वनवे, महेश काळे, नितीन सुरवसे,कांतीलाल डोके, बाळासाहेब गोपाळघरे इत्यादींसह कार्यकर्ते महिला भगिनी व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here