ज्ञानराधा मल्टीस्टेटची तब्बल ३५१५ कोटींची फसवणूक प्रकरणी पिता पुत्राला अटक

0
1633

जामखेड न्युज——

ज्ञानराधा मल्टीस्टेटची तब्बल ३५१५ कोटींची फसवणूक प्रकरणी पिता पुत्राला अटक

बीड येथील कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील फरार असलेल्या व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर पिता पुत्रांना खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यशवंत वसंतराव कुलकर्णी (वय-55) आणि वैभव यशवंत कुलकर्णी (वय-24, दोघे रा. लेगसी मिल्लेन्निया सोसायटी, गायकवाड नगर, पुनवाळे, मुळ शिंदेनगर, बीड)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी 42 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.


बीडमधील कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ५२ शाखेतील साडे चार लाख ठेवीदारांची ३५१५ कोटींची फसवणूक करून फरार झालेल्या उपाध्यक्ष व संचालक पिता- पुत्रांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रार निवारण पथकाने अटक केली आहे.

यशवंत वसंतराव कुलकर्णी (वय ५५), वैभव यशवंत कुलकर्णी (दोघेही रा. लेगसी मिल्लेनिया सोसायटी, पुनावळे, मूळ – शिंदेनगर, बीड) अशी त्यांची नावे आहेत. बीडमधील कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या गैरव्यवहारातील हे आरोपी अनेक दिवसांपासून फरार होते.

दरम्यान, ते वाकडमधील फिनिक्स मॉल येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
पुढील तपासासाठी दोन्ही पिता-पुत्रांना बीड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या आरोपींवर वेगवेगळ्या ४२ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यशवंत कुलकर्णी यांना पकडून देणाऱ्यास रोख बक्षिस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीससह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, पोलीस अंमलदार गणेश गिरी गोसावी, सुनिल कानगुडे, किरण काटकर, किशोर कांबळे, भुपेंद्र चौधरी,प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here