जामखेड न्युज—–
जामखेड येथील तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 9 आरोपींकडून 1,59,200/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
जामखेड शहरातील तपनेश्वर या ठिकाणी तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या बातमीतील ठिकाणी तपनेश्वर गल्ली, जामखेड या ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी भिंतीचे आडोशाला नऊ इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले. त्याच्या कडून 1,59,200/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व नऊ आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अधिकारी पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, ऱ्हदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुन अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
दिनांक 28/07/2025 रोजी नेमण्यात आलेले पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे विजय जाधव हा तपनेश्वर गल्ली, जामखेड या ठिकाणी तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या बातमीतील ठिकाणी तपनेश्वर गल्ली, जामखेड या ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी भिंतीचे आडोशाला काही इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले. जुगार खेळणारे इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे
1) नितीन आश्रुबा रोखडे वय 50 वर्षे, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड,
2) जावेद इस्माईल बागवान वय 44 वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड,
3) संतोष नवनाथ कदम वय 42 वर्षे, रा. कुसडगांव ता. जामखेड,
4) नवनाथ सदाशिव जाधव वय 36 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड,
5) विजय विनायक कळसकर वय 53 वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड,
6) निलेश लक्ष्मण पेचे वय 40 वर्षे, रा. पोकळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड,
7) जयसिंग विश्वनाथ डोके वय 40 वर्षे, रा. भुतवडा, ता. जामखेड,
8) विठ्ठल मोहन भोसले वय 38 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, ता. जामखेड,
9) विजय गहिनीनाथ जाधव वय 53 वर्षे, रा. कर्जत रोड, जामखेड असे असल्याचे सांगितले