जामखेड न्युज——
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत बीड ग्रामीण संघ चमकला, संघात श्री साकेश्वर विद्यालयातील खेळाडूची निवड
प्रशिक्षक सुशील तांबे यांच्या संघाची कामगिरी

बारामती येथे पार पडलेल्या अंडर 17 वयोगटातील
स्पर्धेमध्ये बीड ग्रामीण संघाने क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारून पाचवा येण्याचा बहुमान मिळवला. या संघात श्री साकेश्वर विद्यालयातील खेळाडू शुभम घोडेस्वार यांची निवड झाली आहे. या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाटोदा येथील ओषण क्रिकेट ॲकॅडमी च्या मुलांनी बारामती येथे होणाऱ्या स्पर्धेत बीड जिल्हा संघाकडून सहभाग नोंदवाला. त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात क्वार्टर फायनल पर्यंत जाऊन पूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले.

या संघामध्ये शंतनूदूध वडे, तेजस चोले, सुयोग जाधव, नैतिक जाधव, प्रेमराज जाधव, शंभुराजे घुमरे, करण घुमरे, अरहान शेख, दानिश पठाण, अंश कांकरिया, संकेत बांगर, गणेश चौरे, प्रसाद नागरगोजे, शुभम घोडेस्वार व स्वराज डीडूळ याचा समावेश होता.

संघाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक सुशिल तांबे यांनी विशेष तयारी करून घेतली. संघाचे परिसरात कौतुक होत आहे.

सध्या अनेक शाळेत क्रीडा शिक्षक नाहीत हिच मोठी शोकांतिका आहे. लवकरात लवकर प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा पालकांकडून करण्यात येत आहे.










