जामखेड न्युज——
आता माळीवाडा बसस्थानकाऐवजी या बस स्थानकातून सुटणार बस

अहमदनगर विभागातील माळीवाडा बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे काम ४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माळीवाडा बसस्थानकातील काही फेऱ्या तारकपूर बसस्थानकातून सुटणार आहेत.

४ सप्टेंबर पासून माळीवाडा बसस्थानक येथून मार्गस्थ होणारे पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धुळे, नाशिक, कल्याण, श्रीरामपूर, संगमनेर व नेवासा मार्गावरील सर्व बसेस तारकपूर बसस्थानकातून सुटतील व येथेच संपतील.

माळीवाडा बसस्थानकातून फक्त तारकपूर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या आगारांच्या ग्रामीण फेऱ्या मार्गस्थ होतील. विद्यार्थ्यांसाठी पास वितरण व्यवस्था व प्रवाशांसाठी संगणकीय आरक्षण प्रणाली स्वास्तिक बसस्थानकात कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी दिली.

शहरातील अनेक वर्षापासुनचे जुने असलेल्या माळीवाडा बसस्थानकातून आता बस धावणार नाहीत. त्यासाठीचे पत्र अहमदनगर आगारातून काढण्यात आले आहे. त्यामुळे या बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्या आता या बस स्थानकातून सुटणार नाहीत आणि येथे येणार ही नाहीत.त्या तारकपूर येथील बस स्थानकातून सुटणार आहेत आणि इथेच येणार आहेत. यासंदर्भातील आदेश विभाग नियंत्रक अहमदनगर यांनी सांगितले आहे.
शहरातील माळीवाडा बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या बस गाड्याआता तारकपूर आगारातून सुटणार आहेत राज्य परिवहन मंडळाच्या माळीवाडा बस स्थानकाचे पुनर्बांधणी काम दिनांक 4 सप्टेंबर पासूनसुरू करण्यात येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस नगरहून पुण्याला धावली होती. पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे हे होते. त्यानंतर सरोज टाकी भागातून बस सोडल्या जात होत्या. राज्य परिवहन महामंडळाने माळीवाडा बसस्थानकातून सर्व बस सोडण्यास सुरूवात केली. महामंडळाचा जिल्ह्याचा कारभार या स्थानकातून पहिला जात होता. विभागीय नियंत्रक कार्यालय ही याच इमारतीमध्ये होते.




