जामखेड न्युज ——–
तिसऱ्या श्रावण सोमवारी सौताडा रामेश्वर यात्रेनिमित्त मोठी गर्दी होणार
यात्रेच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसामुळे डोळ्याचे पारणे फोडणाऱ्या धबधब्याचे रौद्र रूप
जामखेड पासुन दहा कि.मी. अंतरावर असलेल्या व
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले सौताडा येथील रामेश्वर दरी येथे सौताडा रामेश्वर यात्रे निमित्त दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची मोठी रिग लागणार आहे. यंदाच्या वर्षीही याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे पारंपरिक आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे. मोठी धार पडत असून डोळ्याचे पारणे फेडणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना पाहता येणार आहे.
तालुक्यातील सौताडा येथे खोल दरी मध्ये कोसळणारा धबधबा. दरी मधील रामेश्वराचे मंदिर व निसर्रम्य परिसर यामुळे भाविक व पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. वनवासाच्या काळात भगवान श्रीरामांनी याठिकाणी वास्तव्य करून या ठिकाणी स्थान केले आणि सीतेसह या ठिकाणी केस विंचरले म्हणून या नदीला विंचरणा नदी म्हणतात, अशी अख्यायिका सांगितले जाते. रामाचे मंदिर आणि शंकराची पिंड यामुळे क्षेत्राला रामेश्वर म्हटले जाते.
याच रामेश्वर दरी मध्ये दरवर्षी श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते. या दिवशीचे खास आकर्षण म्हणजे दुपारच्या सुमारास भुरेवाडी येथील ग्रामस्थ यांचा मान असलेला देवाच्या घोड्याची गावातून मिरवणूक काढली जाते व त्या घोड्याला खाली दरी मध्ये नेऊन त्याठिकाणी त्याची पूजा करण्यात येते . उंचीवरून पडणारा धबधबा नैसर्गीक वरदान लाभलेल्या रामेश्वर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहे.
तसेच परिसरात पावसाने हिवीगार झालेले वनराई विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले, आणि स्वतःदरीमध्ये झोकुन देणारे झरे असे निसर्गाचे खरेखुरे रूप येथे पहायला मिळते. त्यामुळे परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
परम पुज्य पांडुदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सदिच्छा आशीर्वादाने या पवित्र रामेश्वर भूमीचे अध्यात्मक पावित्र्य टिकवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी ग्रामस्थ एकोप्याने आणि ऐक्य आणि बंधुत्व ने एकत्र येत धार्मिक आणि सामाजिक बंधुभावाने वाटचाल करतात.
रामेश्वर धबधबा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सध्या धबधबा ओसंडून वाहत आहे. सध्या धबधब्याने आक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले आहे. पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा धबधबा पाहण्यासाठी उद्या मोठी गर्दी होणार आहे.