जामखेड न्युज———-
अविरत संघर्षाने आयुष्य बदलले – विश्वास नांगरे पाटील
एकेकाळी राईस प्लेटसाठी 15 रूपये नसायचे, आयपीएस झालो
जीवनात अपयश आलं तरी आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करा. आपल्यामध्ये काय कमतरता राहिल्या आहेत? याचा विचार करा. एक काळ होता माझ्याकडे राईस प्लेटसाठी 15 रुपये नसायचे. खुप संघर्ष केला आणि अविरत संघर्षाने आयपीएस झालो व आयुष्य बदलले.
यशोधनमध्ये राहण्यासाठी रुम मिळाली. मेट्रो सिनेमागृहाबाहेर बॉलिवूड सेलिब्रिटींना पाहण्यासाठी उभा राहायचो. बिकट परिस्थितीत काहीजण तुटून पडतात, पण काहीजण रेकॉर्ड ब्रेक करतात”, असे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील म्हणाले. ‘मल्हार’ या मुंबईतील कॉलेज फेस्टिव्हलमध्ये कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
सत्कारात्मक विचारांच्या जोरावर मी स्वत:च नशीब बदललं
विश्वास नांगरे पाटील म्हणाले, मी गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे मी शिक्षणासाठी तालुक्याला गेलो. शिक्षकामुळे आयुष्याला चांगलं वळण मिळालं.
सत्कारात्मक विचारांच्या जोरावर मी स्वत:च नशीब बदललं. 10 वीत शिकत असताना शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणूनही राहिलो. माझा अभ्यास व्हावा, यासाठी मला ते रोज तीन वाजता उठवायचे. तुम्ही ध्येयावर लक्ष केंद्रीत कराल, तरच चांगलं शिकाल. याचाच मला दहावीत शिकत असताना फायदा झाला. मला दहावीला 88 टक्के मिळाले होते, मी तालुक्यात पहिला आलो होतो.
डीएसपी झाल्यानंतर यशोधन इमारतीमध्ये मला घर मिळालं
पुढे बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले, मी खूप अभ्यास केला, पुढे आयपीएस झालो. त्यानंतर माझं आयुष्य बदललं. डीएसपी झाल्यानंतर यशोधन इमारतीमध्ये मला घर मिळालं.
त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी माझा वेळ घेऊन मला भेटायला यायचे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला. यावेळी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी दहशतवाद्यांचा सामना केला. त्यानंतर आमचा गौरव करण्यात आला होता. काळ बदलतो, वेळ बदलतो अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा,असं आवाहनही विश्वास नांगरे पाटील यांनी केलं.