पाणिपतकार विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड मध्ये नोव्हेंबर होणार महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन पंचवीस जिल्ह्यातील कवी व लेखकांची उपस्थिती राहणार

0
300

जामखेड न्युज ———

पाणिपतकार विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड मध्ये नोव्हेंबर होणार महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन

पंचवीस जिल्ह्यातील कवी व लेखकांची उपस्थिती राहणार

मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने जामखेड शहरात भव्य दिव्य असे महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन पानिपतकार विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या संमेलनासाठी पंचवीस जिल्ह्यातील कवी व लेखकांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे जामखेड करांसाठी ही खास मेजवानी ठरणार आहे.

मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने सप्टेंबर अखेर होणारे महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन, विधानसभेची निवडणूक व पाऊसाळी वातावरणाचा विचार करता सदर साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल असे माहिती प्रसिद्ध लेखक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आ.य. पवार व खजिनदार डॉ जतिन काजळे यांनी दिली.

मराठी साहित्य प्रतिष्ठानची संमेलनाचे संदर्भात कार्यकारी मंडळाची मीटिंग नुकतीच झाली त्यामध्ये सर्वानुमते संमेलन दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन दिवसाचे महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन जामखेड येथे घेण्याचे निश्चित करण्याचे आले आहे. राज्यातील पंचवीस जिल्यातील लेखक कवींना निमंत्रित केले जाणार आहे.

दोन परीसंवाद, कथाकथान, निमंत्रितांचे कविसंमेलन, तसेच नवोदितांचे कविसंमेलन, परिसरातील ग्रामीण कलावंताचा लोक जागर कार्यक्रम, असा भरगच्च कार्यक्रम असून प्रसिद्ध कादंबरीकार, ‘पानीपतकार’ विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होईल असे माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात व सदस्य गुलाब जांभळे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here