कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवारांचाच बालेकिल्ला राहणार – अजित वराट

0
942

जामखेड नुज ———-

कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवारांचाच बालेकिल्ला राहणार – अजित वराट

एकेकाळी दुष्काळी व दुर्लक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा कर्जत जामखेड मतदारसंघात 2019 आमदार रोहित पवार झाल्यावर विकास काय असतो हे अगदी थोड्याच दिवसात दाखवून दिले. विविध विकास कामाच्या बळावर जनतेच्या मना मनात आमदार रोहित पवार यांनी एक विकास पुरूष म्हणून ओळख निर्माण केली आहे. यामुळे पुढील अनेक पंचवार्षिक निवडणूकीत कर्जत जामखेड हा आमदार रोहित पवार यांचाच बालेकिल्ला राहणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते अजित वराट यांनी सांगितले.


आमदार रोहित पवार आमदार झाल्यानंतर
मतदारसंघात अनेक विकास कामे आणली, ग्रामीण रुग्णालय शंभर खाटांचे भव्य दिव्य इमारत, पंचायत समिती हेड क्वार्टर, पोलीस क्वार्टर, नगरपरिषद इमारत, नागेश्वर मंदिर रस्ता, बचत गट, निर्धुर चूल वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप, आरोग्यशिबीरे, नेत्र शिबिरे, महिलांसाठी चे आरोग्य शिबिरे एक ना कित्येक, तसेच जलसंधारण, पाणीपुरवठा, नागरीसुविधा,
शिक्षणसंबंधी बालगोपाळापासून, युवकांपर्यंत
आमदार रोहितदादांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेत हजारो सायकलींचे वाटप मतदारसंघात करून माय-माऊलींचे अश्रू पुसण्याचे काम केले यामुळे जनसामान्य लोकांच्या मना मनात आमदार रोहित पवारच आहेत कोणी कितीही गप्पा मारल्या किंवा विरोधात कोणीही असले तरी विकास कामाच्या बळावर परत आमदार रोहित पवारच बाजी मारणार व आमदार होणार असा विश्वास अजित वराट यांनी व्यक्त केला.

आमदार रोहित पवार आमदार होण्या आगोदर मतदारसंघात अनेक समस्या होत्या विकास कामाचा बोजवारा उडाला होता. मोठ्या प्रमाणावर
भ्रष्टाचार, कुचकामी सामाजिक व्यवस्था, ढासळलेली कायदा व सुरक्षा, महिलांवरील अत्याचार या सर्व बाबीत कर्जत-जामखेड चा क्रमांक वर होता एक दुर्लक्षित मतदारसंघ म्हणून पाहिले जात होते.

२०१९ ला सूत्रे रोहितदादानी हातामध्ये घेतली आणि अवघ्या काही महिन्यात आपल्या कामाची चुणूक दाखवून बहुतांशी समस्या वैयक्तिक पातळीवर निपटल्या व शांत जामखेड विकासाच्या मार्गावर असणारे जामखेड अशी ओळख निर्माण झाली.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेकांना आपल्या तुटपुंज्या लोकसंपर्काच्या बळावर आमदार होण्याचे स्वप्न पडत आहेत. त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. कोणीही समोर असले तरी जनसामान्यांच्या जोरावर अनेक टर्म कर्जत जामखेड हा रोहित पवार यांचाच बालेकिल्ला राहणार आहे.

ज्यांना आमदार होण्याची स्वप्ने पडत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तसेच आमदार रोहित पवार म्हणजे विकास पुरूष आहेत. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी यांच्यावर टीका करणं थांबवावे अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असे अजित वराट यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here