जामखेड न्युज – – –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचा पेच सोडविण्यासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याप्रमाणे आता राज्य मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
सीईटी परीक्षेचे वैशिष्ट्ये
राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची असेल परीक्षा
इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे बहुपर्यायी प्रश्न
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही
अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार
परीक्षेमध्ये मराठीचा पर्याय उपलब्ध नसेल
दरम्यान विद्यार्थ्यांना ‘सीईटी’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी राज्य मंडळामार्फत मंडळाच्याच संकेतस्थळावर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.