जामखेड न्युज——
आई वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच मोठा माझा सन्मान – बाबासाहेब कडभने
पोलीस पदी निवड झाल्याबद्दल श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार
जिद्द चिकाटी आणी मेहनतीमुळे माझी निवड अहिल्यानगर पोलीस चालक पदी निवड झाली आहे. माझी निवड झाल्यामुळे आज माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर खुपच समाधान व हाश्य आहे. हेच माझे खरे यश आहे. आपणही जिद्दीने अभ्यास करून यश संपादन करा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
श्री साकेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी बाबासाहेब कडभने याची अहिल्यानगर पोलीस चालक पदी निवड झाल्यामुळे त्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला होता यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, रामचंद्र गवळी, तेजस लहाने, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबासाहेब कडभने म्हणाला की, श्री साकेश्वर विद्यालयात माझा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का झाला यामुळेच माझी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी अंगी जिद्द ठेवून प्रयत्न करा यश निश्चित होणार आहे. आपले आई वडील आपल्या साठी खुप कष्ट घेतात याची जाणीव ठेवली पाहिजे. मुलाला यश मिळाल्यानंतर आई वडीलांना सर्वात जास्त आनंद मिळतो.
बाबासाहेब कडभने याचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी कडभनवाडी येथे झाले तर पाचवी ते दहावी श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे झाले. अकरावी बारावी ल. ना. होशिंग विद्यालय येथे झाले तर बी एस्सी पाटोदा येथील पीव्हीपी काॅलेज येथे झाले. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नगर येथे बी. अँड डब्ल्यू अकॅडमी अहिल्यानगर येथे अभ्यास केला.
बाबासाहेब कडभने यांने शारीरिक मोजमाप परिक्षेत पन्नास पैकी पन्नास गुण मिळवले तसेच थेअरी पेपरला शंभर पैकी 83 गुण मिळवत ओपन कँटँगिरीमध्ये तिसरी रँक मिळवली आहे.