अनेकांच्या मुलांमुलींची लग्ने रखडली, पेन्शन धारकांचे जगण्याचे वांदे, ज्ञानराधाचे ठेवीदार हैराण

0
955

जामखेड न्युज——

अनेकांच्या मुलांमुलींची लग्ने रखडली, पेन्शन धारकांचे जगण्याचे वांदे, ज्ञानराधाचे ठेवीदार हैराण

 

मुलांमुलींच्या लग्नासाठी तसेच सेवानिवृत्ती नंतर व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत
स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहे. या ठेवी परत मिळावे म्हणून संस्थाचालक नऊ महिन्यापासून ठेवीदारांना आश्वासन देत आहे परंतु ठेवी मिळत नाही. ठेवीदारांनी खा.निलेश लंके, आ. राम शिंदे, आ. रोहीत पवार व पोलीस निरीक्षक यांना ठेवी मिळावे म्हणून निवेदन देऊन साकडे घातले आहे.

बीड जिल्ह्य़ातील असलेली ज्ञानराधा को-आँप क्रेडीट सोसायटीची जामखेड येथे अनेक वर्षांपासून शाखा आहे. या संस्थेने ठेवीवर १२ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे जाहीर केले यामुळे जामखेड शहर व तालुका तसेच जवळील आष्टी तालुक्यातील काही गावचे कष्टकरी, मजुर कामगार, व्यापारी, प्रतिष्ठित डॉक्टर यांनी आपल्या आयुष्याची पुंजी ठेव म्हणून संस्थेत ठेवली आहे. मागील दहा महिन्यापूर्वी आयकर विभागाने कुटे ग्रुपवर छापा मारला तेव्हा पासून ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी सदर संस्थेत ठेवी काढण्यासाठी गर्दी केली. परंतु तुमचे पैसे देऊ असे आश्वासन दिले. अनेक वेळा पैसे देण्यासाठी तारखा देऊनही पैसे मिळाले नाही.

जामखेड येथील शाखा नऊ महिन्यापासून बंद आहे. याबाबत ठेवीदारांनी आंदोलन केली. बीड येथील मुख्य शाखेत गेले परंतु आश्वासनखेरीज काहीच मिळाले नाही. घरातील मुलामुलींचे लग्नकार्य, आरोग्य तक्रारी यासाठी पैशाची गरज आहे. हक्काचे पैसे मिळण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ ठेवीदारा वर आली आहे. ठेवीदारांनी ठेवी मिळावे म्हणून खासदार निलेश लंके, आ. राम शिंदे, आ. रोहीत पवार व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनावर शिवलिंग राऊत, शिवकुमार डोंगरे, सुनील दळवी, राम बांबरसे, प्रमोद पवार, डॉ. प्रदीप कात्रजकर, रेखा कात्रजकर, डॉ. बाळासाहेब मुळिक, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. तानाजी राळेभात, डॉ. संजय राऊत, डॉ. सचिन काकडे, डॉ. सर्फराज खान, कुसूम खाडे, संतोष शिंदे आदींच्या सह्य़ा आहेत.

चौकट
बीड जिल्हा जामखेडच्या शेजारी आहे. त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील अनेक मल्टीस्टेट संस्था, बॅंका जामखेड येथे आहे. यापूर्वी अनेक पतसंस्थानी व्याजदराचे मोठे अमिष दाखवले यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, डॉक्टर ठेवी ठेवतात काही दिवसांनी या संस्था गाशा गुंडाळतात असे प्रकार झाले आहेत. बीड जिल्ह्य़ातील कुटे ग्रुपची ख्याती असल्याने व १२ टक्के व्याजदराचे अमिष दाखवले यामुळे आयुष्याची पुंजी भविष्यातील नियोजनावर ठेवतात व नंतर फसवले जाते याबाबत केंद्र सरकारने मल्टीस्टेट व क्रेडिट सोसायटीवर स्वतंत्र नियंत्रण करणारी संस्था असावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here