महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांचा स्तुत्य उपक्रम

0
356

जामखेड न्युज——

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा

सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांचा स्तुत्य उपक्रम

 

आषाढी एकादशी निमित्त खर्डा ते धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोफत बससेवा सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे.


दिनांक 17 जुलै रोजी बुधवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आषाढी एकादशी निमित्त धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत दोन लक्झरी बसची सेवा प्रा. सचिन गायवळ त्यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा.

याबाबत माहिती अशी की, हिंदू समाजासाठी पवित्र असणाऱ्या आषाढी एकादशीला पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी व भाविक भक्त दर्शनासाठी गेले आहेत, परंतु प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी खर्डा व परिसरात सहीत अहमदनगर, धाराशिव, सोलापूर, बीड या जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी धनेगाव येथे येत असतात.


खर्डा शहरातून धनेगाव येथे जाण्यासाठी भाविकांचा ओघ दरवर्षी मोठ्या प्रमाणात असतो एसटी बस व खाजगी गाड्या जास्तीच्या उपलब्ध नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो याचेच गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी भाविकांना दर्शनासाठी खर्डा ते धनेगाव अशा दोन अशा लक्झरी बस मोफत प्रवासासाठी उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर ज्या भाविकांनी दर्शन घेतले आहे त्यांनी परत खर्डा येथे येण्यासाठी पुन्हा त्याच मोफत बसची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धाकटी पंढरी धनेगाव येथे दर्शनासाठी दोन लक्झरी बस मोफत ठेवण्यात आले आहेत तरी भाविक भक्तांनी या मोफत बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. सचिन गायवळ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here