जामखेड शिवजन्मोत्सव महिला समिती करणार तीव्र स्वरूपाचे आंदोलन ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा

0
465

जामखेड न्युज——

जामखेड शिवजन्मोत्सव महिला समिती करणार तीव्र स्वरूपाचे आंदोलन

ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा

 

शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमणांविरोधात आता पुन्हा एकदा शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवजन्मोत्सव महिला समितीच्या अध्यक्षा रोहिणी संजय काशिद यांनी दिला आहे.


सरकारने बेकायदेशीर बांधकामाच्या विळख्यात सापडलेल्या विशाळगडाच्या भोवती असणाऱ्या अतिक्रमणातून गड मुक्त करावा. ज्या बरोबर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाही. जेणेकरुन लवकरात लवकर अतिक्रमण काढावे. तसेच हा लक्षवेधी प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडण्यात यावा. अन्यथा रणरागिणी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.याबाबत सरकारने त्वरित दखल घ्यावी.असा इशारा शिवजन्मोत्सव महिला समितीच्या अध्यक्षा सौ.रोहिणी संजय काशिद यांनी दिला.

जामखेड येथील शिवजन्मोत्सव महिला समिती , जामखेड यांच्यावतीने नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आले. याबाबत माहिती अशी की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचा किल्ले विशाळगडावर बेकायदेशीर बांधकामाच्या विळख्यात सापडला असून विशाळगडावर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमित बांधकाम हटविण्याबाबत शिवजन्मोत्सव महिला समितीच्या महिला आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरून मशाल हाती घेऊन लक्ष्मी चौक ते तहसील कार्यालय येथे मोर्चात” आई भवानी शक्ती दे , विशाळगडाला मुक्ती दे ,प्रतापगड झाँकी है, विशाळगड बाकी है ! अशा घोषणा देत शिवजन्मोत्सव महिला समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा शहरातून काढण्यात आला.

विशाळगडावरील अतिक्रमणा विरोधात तमाम शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत तरी विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण तातडीने हटवा तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व शिवदुर्ग विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून वाचविण्यात यावा. अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.


यावेळी शिवजन्मोत्सव महिला समितीच्या अध्यक्षा रोहिणी संजय काशिद, मीरा तंटक, वैशाली शिंदे,शितल गायकवाड, सीमा लोळगे, सुनीता केवडे, कौशल्या मंडलिक, जयश्री केवडे, आशाबाई राउत, कल्पना परकाळे,आरती राळेभात,गिता नेटके, शितल उगले, विद्या भोसले, कौशल्या जायगुडे, सारिका पठाडे, आदिती उबाळे, मीना बेलेकर, गिता येवले, सोनिया पाटील, गौरी शिंदे, नंदा खंदिरे, सृष्टी काळे, शिवानी पाटील, तनुजा वीर, सृष्टी धुरगुडे,वैष्णवी नेटके, सोनाली मांडवे, पुनम हवळे,आकांक्षा नेटके, सारिका जमदाडे, निर्मला सावंत, प्रणाली कन्हेरे, सुरेखा आमले,अनुष्का कदम,हभप ज्ञानेश्वरी बोराटे ( महाराज), ज्ञानेश्वरी टकले आदी माहिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here