नायगाव ची केळी चालली इराणला गणेश उगले यांची आधुनिक पद्धतीने केली लागवड

0
1491

जामखेड न्युज——

नायगाव ची केळी चालली इराणला

गणेश उगले यांची आधुनिक पद्धतीने केली लागवड

 

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी गणेश उगले यांनी नायगाव येथे सत्तर गंठे क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने जैन जी – 9 या वाणाची लागवड केली केळी बहारदार आली. यामुळे परिसरातील व्यापारी केळी पाहण्यासाठी येऊ लागले. व्यापाऱ्यांच्या सहकार्याने परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केळी इराणला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

सत्तर गंठ्यात सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टन उत्पादन होईल आठरा रूपये भाव मिळत आहे. यानुसार सुमारे आठ ते नऊ लाख रुपये मिळणार आहेत. केळी इराणला पाठविण्यात आली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपा प्रसिद्धी प्रमुख सुनील यादव, मंगेश वारे, केळी उत्पादक शेतकरी गणेश उगले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केळी परदेशात विक्रीसाठी चालली आहे. सध्या केळीचे स्थानिक बाजारभाव ढासळले आहेत.असे असले तरी परदेशात केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केळी एक्सपोर्ट करणाऱ्या व्यापाऱ्यास दिल्यास स्थानिक भाव उतरला तरी केळी पीक परवडते असे उगले यांनी सांगितले.


आगोदर ऊस पीक घेत होतोत. मात्र यामध्ये अनेक अडचणी आहेत. यामुळे केळी उत्पादन घेत आहोत पिकाला पाण्यासाठी शेततळे व विहीर याद्वारे पाणी देतोत.


केळी पीक चांगलेच..!

ऊस परिपूर्ण होऊन गाळपाला जाण्यास एक ते सव्वा वर्ष जाते. कारखाना ऊस कधी नेणार, भाव काय देणार..? हे सर्व परस्वाधीन आहे. शिवाय पैसे वेळेवर मिळतीलच असे नाही. त्यामुळे केळी हे कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. खर्च जाऊन किमान एकरी तीन लाख रूपये उत्पन्न देणारे पीक असून, भाव आल्यावर त्यात वाढ होते. त्यामुळे सध्या केळी हे पीक चांगले आहे.

गणेश उगले केळी उत्पादक शेतकरी नायगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here