जामखेड न्युज——
राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत अदित्य जायभाय व योगेश वाघमोडे सुवर्णपदक
तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर वुशु स्पर्धेसाठी निवड
आयडियल स्पोर्ट अकॅडमी जामखेडच्या अदित्य जायभाय व योगेश वाघमोडे यांना राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांची निवड तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन च्या वतीने मामासाहेब कुस्ती संकुल, कात्रज पुणे येथे नुकतीच राज्यस्तरीय वुशु निवड चाचणी संपन्न झाली.
या निवड चाचणीमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी, जामखेडचे खेळाडू अदित्य जायभाय व योगेश वाघमोडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. दोघांची निवड तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर वुशु स्पर्धेसाठी झाली आहे.
या निवड चाचणीसाठी संघ प्रशिक्षक म्हणून लक्ष्मण उदमले तर संघ व्यवस्थापक म्हणून आबा जायगुडे यांनी काम पाहिले. त्यांना वुशु जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंचे ऑल महाराष्ट्र वुशु संघटनेचे सचिव सोपान कटके, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत-जामखेड विधानसभा सदस्य रोहित दादा पवार, प्रा. सदस्य मधुकर राळेभात यांनी हार्दिक अभिनंदन केले व राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.