स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेजची कु.श्रावणी भाऊराव येडे क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
स्व.एम. ई.भोरे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कुमारी श्रावणी भाऊराव येडे हिने 400 मीटर धावणे (प्लेन)400 मीटर धावणे (अडथळा शर्यत) या दोनही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दिनांक ८ ऑक्टोबर रोजी प्रवरा,लोणी (अहिल्यानगर) येथे झालेल्या जिल्हास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत स्व.एम. ई.भोरे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कुमारी श्रावणी भाऊराव येडे हिने 400 मीटर धावणे (प्लेन)400 मीटर धावणे (अडथळा शर्यत) या दोनही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे यश तिच्या मेहनती, चिकाटी, धाडस, आत्मविश्वास,तसेच या यशा मध्ये क्रीडा शिक्षक प्रा.दादासाहेब मोहिते याचे मार्गदर्शन सातत्यपूर्ण परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
त्यांच्या प्रभावी प्रशिक्षणामुळे श्रावणीने हे यश संपादन केले आहे असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम यांनी व्यक्त केले.
तिच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजयजी भोरे, संचालक प्रा.तेजस दादा भोरे, प्रा.विनोद बहिर, प्रा.प्रदीप भोंडवे,प्रा.सौ स्वाती पवार मॅडम, प्रा.छबिलाल गावित, प्रा.विवेक सातपुते सहा शिक्षकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कु.श्रावणीचे मनःपूर्वकअभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
केवळ श्रावणीसाठीच नव्हे, तर स्व.एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा परंपरेसाठीही एक अभिमानाचा क्षण ठरला आहे.