जामखेड न्युज——
जीवनात यश मिळवण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा – शशिकांत देशमुख
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिवरत्न वराट चा सत्कार संपन्न
आपल्या जीवनात वेळ ही अशी एकमेव गोष्ट आहे जी कधीच परत मिळविता येत नाही. प्रत्येकाला जीवनातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडायच्या असतात. शैक्षणिक वर्षात सुरूवातीपासून जबाबदाऱ्यांचे योग्य संतुलन व ताळमेळ राखून सफलतेचा अनुभव घेण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते. यातच आपले यश दडले आहे. असे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार करण्यात आला होता. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, ज्ञानदेव मुरूमकर, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री साकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी शिवरत्न कैलास वराट दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यालयाचा निकाल 98.18 लागला असून विद्यालयाचा विद्यार्थी वराट शिवरत्न कैलास 96.60 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक घोलप ऋतुजा नामदेव 89.80, तृतीय क्रमांक घोलप प्रतिक्षा दत्तात्रय 85.80 विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी विशेष प्राविण्यासह 24, प्रथम श्रेणी 22, द्वितीय श्रेणी -07, पास श्रेणी 01 अशा पद्धतीने निकाल लागला आहे.
यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग बोलताना म्हणाले की, अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन करा, वेळेचे महत्त्व ओळखा आणि आतापासून अभ्यासाला सुरुवात करा मनापासून अभ्यास करा यश तुमचेच आहे.
यावेळी कैलास वराट, सैफुल्ला खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी प्रियंका डोके हिने याही वर्षी आम्ही दहावीचा शंभर टक्के निकाल लावू असे आश्वासन दिले.
शिवरत्न वराट ने आपल्या यशाचे रहस्य सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी तर आभार राजकुमार थोरवे यांनी मानले.