जामखेड न्युज——
धुळे जिल्हा टीडीएफचा विवेक कोल्हे यांना पाठिंबा
विवेक कोल्हे यांचे पारडे जड
विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ या निवडणूकीत विवेक कोल्हे अपक्ष उमेदवारी करीत आहेत. कोल्हे हे एक तरुण कार्यक्षम, अभ्यासू, व्यक्तिमत्व आहे. कोल्हे यांची विचारसरणी हि टी.डी.एफ. च्या विचारसरणीशी सुसंगत असल्या कारणाने शिक्षण क्षेत्रातील समस्या व शिक्षकांच्या अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी सर्वात सक्षम उमेदवार कोल्हे हे आहेत. याचा विचार करून धुळे जिल्हा टीडीएफचा नाशिक शिक्षक मतदारसंघात कोल्हे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पाचही जिल्ह्यातील शिक्षकांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित समस्या
त्यात मुख्यत्वे जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, शिक्षक भरती, संच मान्यता या व असे अनेक प्रश्न सोडविण्याकामी आपण वचनबध्द असल्याने यास अनुसरुन आपणास धुळे जिल्हा टी.डी.एफ. च्या वतीने जाहीर पाठींबा देत आहोत. तरी टी.डी.एफ. च्या कार्यकर्त्यांनी श्री. विवेक कोल्हे यांच्या विजयासाठी प्रयत्न करावे हि विनंती. भविष्यात शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आपण निश्चितच लढणार याची आम्हाला खात्री आहे. धुळे जिल्हा टीडीएफचा जाहीर पाठिंबा मिळाल्यामुळे विवेक कोल्हे यांचे पारडे जड झाले आहे.
विवेक कोल्हे म्हणतात आपण मिळून हे साकार करू
जुनी पेन्शन, माझे वचन
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी आणि नंतर नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी आणि त्यांचे टेन्शन मिटावे यासाठी निकराचा लढा देणार. सरकार कुणाचेही असो, कोणत्याही पक्षाचे असो मी विधानपरिषदेत आणि रस्त्यावर लढाई लढणार आणि पेन्शनचा हक्क मिळवून देणार, अन्यथा आपल्याकडे पुन्हा मत मागायला येणार नाही.
एक वर्षांची प्रसूती रजाआणि बाल संगोपन कक्ष
शिक्षकांच्या मुलामुलींसाठी, कुटुंबीयांसाठी
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मुला-मुलींसाठी शिक्षण घेण्यासाठी क्रिमिलेअर उत्पन्न
मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.
तंत्रज्ञानाच्या नावाखालची पिळवणूक रोखणार
शिक्षक मान्यता झाली असेल तर शालार्थ आयडी घेण्याची आवश्यकता नाही यासाठी प्रयत्न करणार.
सेवा सुरक्षा हमी विनाअनुदानित सेवकांचा लढा सोडविणार तीढा,अशैक्षणिक कामांना आळा.
यामुळे तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक विवेक कोल्हे यांच्या पाठिशी उभे राहणार आहेत.