जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
मुंडे भगिनींना भाजपात सातत्याने डावलले जात असल्याने चिडलेल्या मुंडे समर्थकांनी राज्यभरात राजीनामे सत्र हाती घेतले आहे. याचे पडसाद जामखेड तालुक्यात उमटले. सोमवारी जामखेड भाजपच्या 45 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सोपवल्याने भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंडेप्रेमी कार्यकर्ते व नेत्यांनी मुंडे भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.त्यादृष्टीने रविवारी दिवसभर मुंडे समर्थकांनी राजीनामा देण्यासंबंधीची मोहीम सोशल मिडीयावर राबवली होती. खर्डा भागातील भाजपाचे युवा नेते बाजीराव गोपाळघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
सोमवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे व भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्या उपस्थितीत जामखेड भाजपची कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सोपवले आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये पंचायत समिती माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य भगवानराव मुरूमकर, विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड प्रविण सानप, ओबीसी सेल जिल्हा कार्यकारणी सदस्य बाजीराव गोपाळघरे,ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस काशीनाथ ओमासे, वैजीनाथ पाटील, संतोष पवार, नानासाहेब गोपाळघरे,अनिल लोखंडे, डाॅ सोपान गोपाळघरे,दिपाली गर्जे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिपाली गर्जे,राजेंद्र ओमासे, उध्दव हुलगुंडे, बाळासाहेब गोपाळघरे, नवनाथ गोपाळघरे, बाळासाहेब गीते, नागनाथ मुरूमकर, महारूद्र महारनवर, मच्छिंद्र गीते, पांडुरंग गर्जे, ईश्वर मुरूमकर, शिवाजी गीते, अशोक महारनवर, हर्षल बांगर, रोहिदास गीते, कविता मनोज राजगुरू भाजपा उपाध्यक्ष, निलावती मच्छिंद्र गीते, संदिप गीते, राहुल ढाळे, सुनिल रंधवे, बाळू दराडे, रंगनाथ गिरी, संतोष माने, मनोज राजगुरू, गहिनीनाथ गीते, अशोक गीते, राजकुमार गोसावी, संदिप जायभाय, एकनाथ गोपाळघरे, अशोक गोपाळघरे, भरत होडशीळ, भागवत सुरवसे , सुभाष जायभाय, सागर सोनवणे, तानाजी फुंदे, सह आदी पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत.
चौकट
कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास हा फक्त सोशल मिडीयावर दिसत आहे प्रत्यक्षात कोठेही कसलाही विकास नाही. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमदार रोहित पवार देवू शकत नाहीत तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशी विषयी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, कर नाही त्याला डर कशाला खुशाल चौकशी करावी मी घाबरत नाही.