जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार यांना माझे खुले आव्हान आहे जलसंधारण खात्याची कितीही चौकशी करा, मी घाबरत नाही कारण या खात्यामध्ये केवळ लोकांच्या हिताची कामे झालेली आहेत. अशाप्रकारे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना कर्जत तालुक्यातील तीर्थक्षेत्र शेगुड या ठिकाणी शड्डू ठोकून आव्हान दिले आहे. कर्जत तालुक्यातील तीर्थक्षेत्र शेगुड या येथे आज रविवारी जिल्हा परिषद सदस्य सुनीता अशोक खेडकर यांच्या माध्यमांमधून झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळाा माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाला.
यावेळी अशोक खेडकर, नामदेव राऊत, प्रकाश शिंदे, दादासाहेब सोनमाळी, सुनील यादव, पप्पू धोदाड, भारत मासाळ, संदीप सागडे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषद सदस्य सुनीता अशोक खेडकर यांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामे मंजूर करून आणली आहेत. त्या माध्यमातून त्यांनी विकासकामांचा धडाका गटामध्ये उडवला असून अशाच एका कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा आज शेगुड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जलसंधारणाची चौकशी फक्त कर्जत तालुक्यातयावेळी राम शिंदे बोलताना म्हणाले की, जलसंधारणाची कामे राज्यामध्ये झालेली आहेत, पण चौकशी फक्त कर्जत तालुक्यातील कामांची सुरू आहे. चौकशी कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे हे आता सर्वांना लक्षात आले आहे. कितीही चौकशी करा जलसंधारणाची कामे जनतेसाठी झाली आहेत. एकही टॅंकर गावांमध्ये लागला नाही. लोकांची पिके चांगली येऊ लागली आहेत यातच सर्व काही जनतेसाठी झाल्याचे दिसून येते त्यामुळे माझे त्यांना आव्हान आहे की चौकशी करा..
आमदार रोहित पवार माझ्या प्रश्नांना उत्तर देण्यास घाबरतात…
यावेळी बोलताना माजी मंत्री राम शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्य सुनीता अशोक खेडकर यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी जिल्हा परिषद गटांमध्ये प्रत्येक गाव वाडी – वस्तीवर विकासकामे केली आहेत, हे सांगितले. मात्र, या कार्यक्रमात त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर प्रखर टीका करताना मी विचारलेल्या प्रश्नांना आमदार रोहित पवार उत्तर देण्यास घाबरतात, काय असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला. गेल्या दीड वर्षामध्ये मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मात्र, एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले नाही, हे आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला जनतेचसाठी उत्तर देण्याची जबाबदारी त्यांची आहे. मतदारसंघावर भानामती…मतदारसंघातील जनतेला निवडणुकीच्या काळात भानामती काय असते हे आता समजले आहे. पुढील काळामध्ये तालुक्यातील जनता झालेली चूक नक्कीच दुरुस्त करतील, अशी मला आशा वाटते, असे राम शिंदे असे बोलून दाखवले. ते पुढे म्हणाले की, कुकडीच्या पाण्याचा लोकप्रतिनिधींनी खेळखंडोबा करून ठेवला आहे मतदारसंघात ते रहात नाहीत यामुळे कधीतरी एक दिवस येतात आणि दहा-पंधरा फोटो काढून ते सोशल मीडियामधून रोज एक फोटो दाखवून सध्या, तरी मतदारसंघाचा विकास फक्त सोशल मीडियातून सुरू आहे, अशी टीका राम शिंदे यांनी केली. यावेळी बोलताना नामदेव राऊत म्हणाले की, अशोक खेडकर यांनी चापडगाव जिल्हा परिषद गटांमध्ये प्रकाश शिंदे यांच्या सोबतीने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांची देखील त्यांना मोलाची साथ लाभली आहे. खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद गटाचा चेहरामोहरा खेडकर यांनी या ठिकाणी बदललेला दिसून येतो.यावेळी बोलताना अशोक खेडकर म्हणाले की, माझ्या जिल्हा परिषद गटांमध्ये प्रत्येक गाव, वाडी, वस्ती या ठिकाणी आपण काहीतरी निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने गटामध्ये संपर्क ठेवलेला आहे. अनेकांच्या वैयक्तिक लाभाची कामे देखील केलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व योजना गटामध्ये राबवल्या आहेत. त्यामुळे एवढी कामे आहेत की रोज एका कामाचे उद्घाटन केले, तरी सहा महिने केवळ उद्घाटने करावे लागतील, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहेयावेळी बोलताना दादासाहेब सोनमाळी म्हणाले की माजी मंत्री राम शिंदे व अशोक खेडकर यांनी चापडगाव जिल्हा परिषद गटांमध्ये जनतेने मागणी केलेली व मागितलेले देखील प्रश्न सोडवले आहेत. उलट आता असलेले लोकप्रतिनिधी कसे आहेत आता हे लिखित जनतेच्या लक्षात आलेली आहे. लोकांना देखील आपली चूक समजली असून पंगतीला बसल्यावर वाढप्या हा ओळखीचा व घरातील लागतो हे आता तालुक्यातील जनतेच्या लक्षात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार भारत मासाळ यांनी मानले.