जामखेड न्युज——
न्यू इंग्लिश स्कुल राजुरीत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वाटप, नवीन मुख्याध्यापक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सरपंच व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. नवीन मुख्याध्यापक पारखे बी ए व दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

न्यू इंग्लिश राजुरी विद्यालयात आज दि १५ जून २०२४ शनिवार रोजी मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप, नवीन प्रवेश घेतले त्या विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच१० वीतील प्रथम आलेल्या तीन विद्यार्थीनींचा सत्कार व नवनियुक्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला राजुरी ग्रामपंचायत व पालक यांच्या वतीने मुख्याध्यापक पदावर नव्याने नियुक्त झालेले श्री पारखे बी.ए यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. नवीन प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे संस्थेच्या शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

१० वी प्रथम कु वारे मयुरी धनराज,
कु. तेजस्विनी दत्तात्रय डोंगरे द्वितीय,
कु· श्रुतीकाअशोक अडाले, (तृतीय) यांचा देखील श्रीफळ, गुलाबपुष्प व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.

सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विदयार्थ्यांचे स्वागत करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विकास तात्या सदाफुले यांनी पालकांच्या वतीने मार्गदर्शन केले मुख्याध्यापक पारखे बी.ए यांनी शाळेत विदयार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाईल व विविध उपक्रम राबवून शाळेचा दर्जा उंचावण्याचे पालकांना आश्वासन दिले.

यावेळी सरपंच सौ. आश्विनी सागर कोल्हे, सागर कोल्हे, ग्रा पं सदस्य काकासाहेब कोल्हे, दत्तात्रय मोरे पोलीस पाटील राजुरी, विकास सदाफुले, बाळासाहेब माने उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, बाबासाहेब खाडे, अशोक अडाले, नवनाथ घुले, भरत घुले, दादासाहेब आजीनाथ खाडे, धनराज वारे, सुभाष घुले सर, यासह अनेक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिता पिसाळ यांनी केले. तर आभार सुरवसे यांनी व्यक्तकेले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


