जामखेड न्युज——
जामखेड येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने शिक्षक पदी निवड झालेल्या आहिरे, मुळे, आंधळे यांचा सत्कार
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेडचे विद्यार्थी राहुल आहीरे यांची कोपरगाव नगरपालिका, कृष्णा मुळे यांची रयत शिक्षण संस्था व संतोष आंधळे यांची गोंदिया जिल्हा परीषद मध्ये शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री संदीप कदम सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की आपले उच्च ध्येय गाठताना आपली बलस्थाने व कमकुवत बाजू विचारात घ्या. तसेच जीवन जगत असताना शारीरिक , मानसिक व आर्थिक बाजू मजबूत करा. शाहू,फुले,आंबेडकर विचार आचरणात आणा व जीवनात यशस्वी व्हा असा कानमंत्र दिला.
या वेळी यशस्वी विद्यार्थ्यानी आप आपले अनुभव कथन केले. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन केले आणी यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले.
प्रमूख पाहुणे श्री कदम सर यांनी दिवसेन दिवस यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे या बद्दल आनंद व्यक्त केला.
यावेळी श्री नागेश विद्यालय एन. सी. सी ऑफिसर मयूर भोसले सर ,तक्षशिला कॉलेज चे प्रा. आव्हाड सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत श्री शिंदे बी.एस.यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिक्षा खाडे यांनी पार पाडले.व उपस्थित सर्वांचे आभार अर्चना साखरे यांनी मानले.