निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांना कोणत्या तालुक्यात किती मताधिक्य

0
2460

जामखेड न्युज——

निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांना कोणत्या तालुक्यात किती मताधिक्य

 

महाराष्ट्रातील हाय होल्टेज मतदारसंघ म्हणून नगर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. महायुतीकडून डॉ. सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके उमेदवार होते. मतमोजणी वेळी कधी विखे तर कधी लंके मताधिक्य कमी जास्त होत होते. एकुण मतदान 1325477 ( तेरा लाख पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर) झाले होते. एकुण पंचवीस व नोटा एक असे 26 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात 28929 मताधिक्य घेत निलेश लंके विजयी झाले आहेत.

कर्जत जामखेड, श्रीगोंदे व पारनेर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी आघाडी घेतली तर अहमदनगर शहर, शेवगाव पाथर्डी व राहुरी विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील आघाडीवर होते. पारनेर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड ने निलेश लंके यांना साथ दिली तर अहमदनगर शहर, राहुरी व शेवगाव पाथर्डी या तालुक्यानी विखेला साथ दिली.

लंके यांना पारनेर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड मधुन मताधिक्य

निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात लंके यांना 130440 तर विखे यांना 92340 मते मिळाली यात लंके यांनी 38100 मताधिक्य घेतले
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांना 118936 मते तर सुजय विखे यांना 86259 मते मिळाली यात लंके यांनी 32711 मतांची आघाडी घेतली.
कर्जत जामखेड मतदारसंघात निलेश लंके यांना 104936 मते तर सुजय विखे यांना 95835 मते मिळाली यात लंके यांनी 9128 मतांची आघाडी घेतली.

डॉ सुजय विखे यांना नगर शहर, राहुरी व शेवगाव पाथर्डी मधुन मताधिक्य

नगर शहरात डॉ सुजय विखे यांना 105859 मते तर निलेश लंके यांना 74263 मते मिळाली यात विखे यांना 31596 मातांची आघाडी मिळाली.
राहुरी विधानसभा मतदारसंघात डॉ सुजय विखे यांना 106903 मते मिळाली तर निलेश लंके यांना 94967 मते मिळाली यात विखे यांना 11936 मतांची आघाडी मिळाली. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात डॉ सुजय विखे यांना 106992 मते तर निलेश लंके यांना 98551 मते मिळाली यात 8441 मतांची आघाडी विखे यांना मिळाली.


निलेश लंके यांना एकुण 624797 मते मिळाली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते मिळाली यात निलेश लंके यांना 28929 मतांची आघाडी घेत निलेश लंके यांनी विजय संपादन केला.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत 2019 मध्ये भाजपने दिलीप गांधी ऐवजी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु त्यानंतर भाजपची विजयाची परंपरा चालू राहिली. सुजय विखे यांनी विक्रमी 704,660 मते घेत विजय मिळवला तर विरोधी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली.

 

निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार होते. परंतु निवडणुकीपूर्वी ते शरद पवार गटात दाखल झाले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. एक खासदार तीन आमदारांसह अहमदनगर मतदार संघावर भाजपचे प्राबल्य होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड मतदार संघ
आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा इतिहास
2009 पासून अहमदनगर मतदार संघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 2009 मध्ये भाजपकडून दिलीपकुमार मनसुखलाल गांधी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा दिलीप गांधीच विजयी झाले. त्यांना 605,185 मते मिळाली तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव राजळे यांना 3,96,063 मते मिळाली होती. त्यानंतर 2019 मध्ये भाजपने दिलीप गांधी ऐवजी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु त्यानंतर भाजपची विजयाची परंपरा चालू राहिली. सुजय विखे यांनी विक्रमी 704,660 मते घेत विजय मिळवला तर विरोधी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली होती. यावेळी मात्र निलेश लंके यांनी डॉ सुजय विखे यांना धोबीपछाड दिला आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here