वाराणसीमध्ये पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6 हजार 223 मतांनी पिछाडीवर

0
371

जामखेड न्युज——

वाराणसीमध्ये पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6 हजार 223 मतांनी पिछाडीवर

 

 

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6 हजार 223 मतांनी पिछाडीवर गेले आहेत. काँग्रेसच्या अजय राय यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.

 

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6 हजार 223 मतांनी पिछाडीवर गेले आहेत. सकाळी 9.15 मिनिटांनी आलेला हा कल आहे. काँग्रेसच्या अजय राय यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत अजय राय यांनी 11,480 मत मिळवली आहेत. तर नरेंद्र मोदींना 5257 मत पडली आहेत. त्यामुळे देशातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या जागेवर यावेळी सुरुवातीच्या कलांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान हे सुरुवातीचे कल असून यामध्ये मोठे बदल होऊ शकतात.

अहमदनगर मध्ये सुजय विखे आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलच्या अगदी उलट खेळ रंगू लागला असून भाजपा २६ तर सपा 32 जागांवर आघाडीवर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६००० हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. काँग्रेसचे अजय राज आघाडीवर आहेत.

65 जागांच्या ट्रेंडमध्ये समाजवादी पक्षाला मोठी आघाडी मिळाली आहे. समाजवादी पक्षाला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर भाजपने 25 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. आझाद समाज पक्ष एका जागेवर तर आरएलडी एका जागेवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here