जामखेड न्युज——
जामखेड बस स्थानक परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढले, पोलीसांचा वचक कमी

जामखेड बसस्थानकात सध्या गर्दीचा फायदा घेत चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलीस फक्त एखादा फेरफटका मारून निघुन जातात. काही दिवसांपूर्वीच जामखेड बस स्थानकातील एका महिलेच्या पर्स मधील अडीच तोळे सोन्याचे गंठण चोरीस गेले आहे. वारंवार होणाऱ्या बस स्थानकातील चोर्यांनमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

जामखेड बस स्थानकाचे सध्या नविन बांधकाम सुरू आहे. त्यातच प्रवाशांना भर उन्हात ताटकळत बस ची वाट बघत बसावे लागते. त्यातच स्थानकात जागा नसल्याने अनेक प्रवासी दाटीवाटीने बसची वाट बघत बसत आसतात . सध्या बस स्थानकात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. याचाच फायदा घेत चोरटे महीलांच्या बॅग, पर्स अथवा गळ्यातील सोन्याचे दागिने मोठ्या हातचालाकीने चोरुन नेतात.

बुधवार दि 22 रोजी दुपारी फीर्यादी महीला शितल प्रदिप उबाळे रा. हडपसर, पुणे ही महीला बसमध्ये चढण्यासाठी जात असताना गर्दीचा फायदा घेत गळ्यात अडकवलेल्या पर्स मधिल 62,500 रुपयांचे सोन्याचे गंठण चोरुन नेले.

याबाबत सदर महीलेने दि 28 मे रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील अज्ञात चोरटयान विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा बस स्थानकात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी ठेवण्यात आलेली पोलीस चौकी ही शोभेची वस्तु झाली आहे. अनेक वेळा चोर्या घडुन देखील पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.

चोरीची घटना घडली तर दोन चार दिवस बसस्थानक परीसरात पोलीसांनकडुन फेरी मारली जाते. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलिस कर्मचारी नेमण्यात यावा अशी मागणी प्रवाशांन कडुन होत आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


