जामखेड न्युज——
पिकअपची रिक्षाला धडक पाच जण जखमी
पाडळी फाट्यावरील घटना
ग्रामीण भागातही हिट अँण्ड रन आणि ड्रिंक अँन्ड ड्रायव्ह च्या घटना
जामखेड करमाळा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाडळी फाट्यावर असलेल्या चौकात रस्त्याच्या कडेला बंद असलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली असता रिक्षाने दोन ते तीन पलट्या मारल्या व तेथे बसलेल्या पाच जणांवर जाऊन आदळली यामुळे ते सर्व जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत.
पिकअप चालकाला तेथील नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली आहे. पाच पैकी तीन जण गंभीर जखमी आहेत ड्रिंक अँन्ड ड्रायव्ह चाचणीसाठी पोलिसांनी पिकअप चालकाला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रिक्षा चालक संतोष गोरख डुचे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाडळी फाट्यावरील हाँटेल साई समोर वेगात येणाऱ्या पिकअप एम. एच. 16 ए. वाय 7382 ने उभ्या असलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींची नावे
१)हनुमंत सुर्यवंशी वय ४२ झिक्री तालुका जामखेड
जबर जखमी
२)बाळासाहेब बापू गाडे वय ४० राहणार सरदवाडी तालुका जामखेड किरकोळ जखमी
३)अतुल खवले वय ३५ मुक्काम पोस्ट पिंपळगाव आळवा तालुका जामखेड
४)संतोष डूचे ४०मुक्काम पोस्ट चोबेवाडी
५) चेतन ठाकरे वय ३५ पाडळी फाटा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर
जखमी झाले आहेत त्यांच्यावर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अशी फिर्याद देत आरोपी युवराज अशोक खैरे रा. गुरेवाडी ता. जामखेड या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे करत आहेत.