जामखेड न्युज——
शेळी मेल्याच्या कारणावरून जामखेडमध्ये भर चौकात मारहाण, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
साकत जामखेड रस्त्यावर सावरगाव शिवारात उत्तम रामा गोरे यांच्या शेळीला साकतकडून जामखेड कडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने उडवले यात शेळी जाग्यावर मृत्यू पावली तेव्हा चालकांकडून नुकसान भरपाईसाठी जामखेड जयहिंद चौकात बोलणी चालू असताना दुपारी भर चौकात मारहाण झाली तशी फिर्याद दादासाहेब अंकुश ढवळे यांनी दिली आहे यानुसार एकुण आठ ते नऊ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर चौकात मारहाण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फिर्यादी दादासाहेब अंकुश ढवळे रा. सावरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३ रोजी दुपारी ११.४५ दरम्यान मी सारोळा येथून जामखेड येथे जयहिंद चौकात आलो असता खुप गर्दी दिसली तेव्हा पाहिले तर गावातील उत्तम रामा गोरे, बाबासाहेब धोंडीबा गोरे, संतोष विश्वनाथ गोरे, चक्रधर अशोक ढवळे दिसले तेव्हा मला कळले की दि. २३ रोजी उत्तम गोरे यांची शेळी साकतकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार गाडी नंबर एम. एच 3 सी. पी. 2542 गाडीने धडक दिल्याने शेळी मृत्यूमुखी पडली आहे.
तेव्हा भरपाई बोलणे सुरू असताना आरोपी गुज्जु आतार, वसीम इसाक शेख, बबलू उर्फ गुड आरिफ सय्यद, शहानवर कुरेशी सर्व रा. जामखेड ता. जामखेड व इतर अनोळखी 4 से 5 व्यक्तींनी आम्हाला शिवीगाळ व दमदाटी करून लाथा बुक्क्याने माझे हाता, पायावर व पाटित तोंडावर मारहान करुन मला जखमी केले. असे म्हटले आहे.
जामखेड शहरात दि. २२ रोजी भरदिवसा चौकात मुलांचे भांडण झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा झाला होता. परत दि. २३ रोजी दुपारी आठ ते नऊ जणांनी एका व्यक्तीला मारहाण झाली यामुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे जामखेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.
स्विफ्ट डिझायर कार चालकाविरोधात शेळी मारल्याचा उत्तम गोरे यांनीही गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस काँन्टेबल जितेंद्र सरोदे करत आहेत.