जामखेड न्युज——
पिंपळवाडी (साकत) ची आरोही नेमाने ही स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरी
जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी (साकत) येथील
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थींनी आरोही (पुनम) दादासाहेब नेमाने हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा (लक्षवेध) मध्ये 98 टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
आरोही ही इयत्ता पहिली मध्ये शिकत असून राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा लक्षवेध प्रज्ञाशोध या परीक्षेत आरोहीने शंभर पैकी 98 गुण घेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडीचे मुख्याध्यापक राम ढवळे, वर्गशिक्षिका वर्षा जगताप (ढवळे) आजोबा आश्रू नेमाने, समृद्धी दादासाहेब घोलप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, प्रा. अरूण वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, सरपंच हनुमंत पाटील, दादासाहेब मोहिते, महारुद्र नेमाने, दिलीप घोलप, अशोक घोलप, दादासाहेब नेमाने सह पिंपळवाडी साकत येथील ग्रामस्थ व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
पिंपळवाडी हे गाव साकत ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असून ग्रामस्थांनी लाखो रुपये लोकवर्गणी करून जिल्हा परिषदेची पिंपळवाडी प्राथमिक शाळा डिजिटल केली आहे. डिजिटल झालेली शाळा ही पिंपळवाडीची पहिलीच शाळा ठरली आहे.
आरोहीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे पिंपळवाडीचे नाव पुन्हा राज्यात चमकले आहे.