जामखेड न्युज——
निलेश लंके साहेब किंवा मी लोकसभेची निवडणूक लढविणारच – राणीताई लंके
जामखेडमध्ये आशा भेळचे शानदार उद्घाटन

भाजपाने विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना परत लोकसभेची संधी दिली आहे पण विरोधात उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत याबाबत पत्रकारांनी राणीताई लंके यांना विचारले की, तुतारी कोण वाजविणार आमदार निलेश लंके की, राणीताई लंके यावर उत्तर देताना राणीताई लंके म्हणाल्या की, अद्याप नक्की नाही पण दोघांपैकी एक उमेदवार निश्चित असणारच असे सांगितले.

बीड रोडवरील प्रफुल्ल सोळंकी व किरण रेडे यांच्या आशा भेळचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील, पांडुरंगशास्त्री देशमुख, रमेश गुगळे, सागर अंदुरे प्रा. मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, मंगेश आजबे, अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, करण ढवळे, आशा भेळचे संस्थापक रमेश बनबेरू, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, गुलाब जांभळे, विनायक राऊत, प्रा. अनंता खेत्रे, अशोक बहिर, पवन राळेभात, आनंद कोठारी, अमृत कोठारी, राहुल उगले, अमित जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे, संजय हजारे अँड. बंकट बारवकर, काका चव्हाण, विठ्ठल चव्हाण, प्रा. अरूण म्हस्के, प्रा. अरूण वराट, डॉ. अविनाश पवार, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. भरत देवकर, डॉ. सादेक पठाण, अँड. प्रमोद राऊत, उद्धव हुलगुंडे, मयूर भोसले, अँड. प्रविण सानप, दिगंबर चव्हाण, सौरभ उगले, गणेश जगताप सह सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरा पर्यंत अनेक मान्यवर भेट देऊन शुभेच्छा देत होते.

खासदार डॉ सुजय विखे पाटील उद्घाटन करून शुभेच्छा देऊन निघून गेले आणी पाच मिनिटांत राणीताई लंके आल्या यावेळी बोलताना सांगितले की, भेळचा दर्जा उत्तम आहे. आशा भेळच्या रूपाने जामखेडच्या वैभवात भर पडणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा लढविण्याचा निर्धार केलेल्या आमदार निलेश लंके यांच्या मनात अजूनही द्वंद्व सुरू आहे. जर निवडणूक लढवायची झाली तर पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल नाहीतर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते, या अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर निलेश लंके सावध झाले आहेत. त्यामुळे भाजपाच्या विखे समोर विरोधकांचा उमेदवार कोण अद्यापही गुलदस्त्यात आहे पण लंके घरातील एक उमेदवार राहणारच असा विश्वास राणीताई लंके यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीची लोकसभा उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके मोदीबागेत शरद पवार यांच्या भेटी घेत उमेदवारी बाबत चर्चा झाली पण माहिती समजू शकली नाही.

महाविकास आघाडीकडून निलेश लंके उमेदवार असतील असे संकेत अनेक दिवसांपासून मिळत आहेत. लंके यांनी त्या दृष्टीने बरीच पावले पुढे टाकली आहेत. मात्र, त्यांनी किंवा पक्षानेही अजून पर्यंत तरी अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र काहीही करून येत्या दोन दिवसांत लंके यांना किंवा शरद पवार गटाला उमेदवारीसंदर्भात निर्णय जाहीर करावा लागणार आहे.

निलेश लंके यांना कशाची भीती?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके यांनी मतदारसंघातील विकासासाठी निधीची आवश्यकता लक्षात लक्षात घेऊन अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु अजित पवार यांच्या गटात जाताना लोकसभा निवडणुकीची इच्छा त्यांच्या मनात होतीच. परंतु नगर दक्षिणची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने विद्यमान खासदार सुजय विखे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली. त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकण्यासाठी निलेश लंके शरदचंद्र पवार गटात प्रवेश करू इच्छितात. मात्र जर पक्षांतर करायचे झाले तर त्यांना प्रथमत: आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल नाहीतर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते, अशी भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवल्याने यावर तोडगा काढण्यासाठी ते शरद पवार यांची भेट घेतली आहे.
त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निलेश यांचा खरे तर प्रयत्न आहे. त्यामुळे कारवाईपासून वाचता येते. मात्र, पवार गटाकडून त्याला मान्यता मिळत नाही. स्वत: लंके यांनीच यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.यामुळे लंकेंना निर्णय घ्यायला वेळ लागत आहे.
लोकसभेची निवडणूक दोघांपैकी एक उमेदवार असणार हे आता नक्की झाले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकम महाराज यांनी केले.


