जामखेड न्युज——
आशा भेळच्या रूपाने जामखेडच्या वैभवात भर – खासदार डॉ सुजय विखे पाटील
जामखेडमध्ये आशा भेळचे उद्घाटन
आशा भेळच्या रूपाने जामखेडच्या वैभवात भर पडली आहे. जामखेड करांना आता चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळणार आहे असे मत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. व आशा भेळसाठी शुभेच्छा दिल्या.
जामखेड शहरात पांढरीच्या पुलाची प्रसिद्ध आशा भेळसह शंभराहून अधिक खाद्यपदार्थांची मेजवानी एकाच छत्राखाली शहरातील बीड रोडवर केकीज येथे ग्रामीण रुग्णालयासमोर गुरूवार दि. २१ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.
यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील, पांडुरंगशास्त्री देशमुख, रमेश गुगळे, सागर अंदुरे प्रा. मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, मंगेश आजबे, अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, करण ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, गुलाब जांभळे, विनायक राऊत, प्रा. अनंता खेत्रे, अशोक बहिर, पवन राळेभात, आनंद कोठारी, अमृत कोठारी, राहुल उगले, अमित जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे, संजय हजारे,अँड. बंकट बारवकर, काका चव्हाण, विठ्ठल चव्हाण, प्रा. अरूण म्हस्के, प्रा. अरूण वराट, डॉ. अविनाश पवार, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. भरत देवकर, डॉ. सादेक पठाण, अँड. प्रमोद राऊत, उद्धव हुलगुंडे, मयूर भोसले, अँड. प्रविण सानप, दिगंबर चव्हाण, सौरभ उगले, गणेश जगताप यांच्या सह सर्व पत्रकार व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशा भेळसह शंभराहून अधिक खाद्यपदार्थ एकाच छत्राखाली मिळणार आहेत येथे चाट काँर्नर, साऊथ इंडियन, मिसळ हाऊस, आईस्क्रीम पार्लर, ज्युस, सेलिब्रेशन हाँल ( वातानुकूलित) रेस्टॉरंट अशी जामखेडची खाऊगल्ली खवय्यांसाठी मेजवानीचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते झाला.
जामखेडच्या खाद्यसंस्कृती मध्ये केकीज चे संचालक प्रफुल्ल सोळंकी व पत्रकार किरण रेडे यांनी खाऊगल्लीच्या रूपाने पदार्पण केले आहे.
खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आशा भेळचे उद्घाटन झाले विखे पाटील निघून गेल्यावर राणीताई लंके आल्या व आशा भेळमधील शाबुदाना वड्याचा आस्वाद घेतला.
फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था आहे तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग आहेत.चाट काँर्नर, साऊथ इंडियन, मिसळ हाऊस, आईस्क्रीम पार्लर, ज्युस, सेलिब्रेशन हाँल ( वातानुकूलित) रेस्टॉरंट अशी जामखेडची खाऊगल्लीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकम महाराज यांनी केले.