जामखेड न्युज ——–
जामखेडमध्ये दुसऱ्या मोरेचा प्रताप, शेअर्स बाजारात मोठी अफरातफर
वर्षभरापासून अनाधिकृत गैरहजर शिक्षकास हजर करून घेऊ नका – दिनेश शिरसाठ
शेअर्स बाजारात ज्यादा पैशाचे अमिष दाखवणारा एजंट शिक्षक वर्षभरानंतर जामखेड मध्ये प्रकट झाला आहे. वर्षभरापासून गैरहजर असलेल्या शिक्षकाला हजर करून घेऊ नका अशी मागणी दिनेश शिरसाठ यांनी केली आहे.
साकत येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेला बाळासाहेब मारूती मोरे याने जास्त पैशाचे अमिष दाखवून जामखेड व इतर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला व तो जामखेड येथून वर्षभरापासून फरार होता. सदर शिक्षक जामखेड येथे कुटुंबासह पाच सहा दिवसा पासून राहायला आला आहे.
त्यास जामखेड गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षक म्हणून हजर करून घेऊ नका असा निवेदन अर्ज फसवणूक झालेला गुंतवणूकदार दिनेश राजेंद्र शिरसाठ यांनी जामखेड शिक्षण विभागाला दिला आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.
याबाबत दिनेश शिरसाठ यांनी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील मौजे साकत येथील जि.प.प्राथमिक शाळेत बाळासाहेब मारुती मोरे हे शिक्षक कार्यरत होते. दिनांक १७ मार्च २०२३ ते १७ मार्च २०२४ पर्यंत शिक्षण विभागाला कोणतेही पुर्वसुचना न देता वर्षभर ते गैरहजर होते व आता ते जामखेड येथे कुटुंबासह राहण्यास आले आहे.
वर्षापूर्वी त्यांनी जामखेड शहर व तालुका तसेच आजुबाजुच्या तालुक्यातील शिक्षक, व्यापारी इतर नोकर वर्ग व माझ्या कडुन मोठया प्रमाणावर रक्कमा घेऊन शेअर बाजारात दुप्पट पैसे मिळवुन देतो असे सांगुन पैसे घेतले या सर्व लोकांचे पैसे न देता तो फरार झाला होता.
त्यामुळे तो वर्षभर कोठे होता ? विद्यार्थ्यांना शिक्षण न देता कसा निघुन गेला व आता परत का आला? सरकारचे नियम न पाळल्यामुळे त्याच्यावर काय कारवाई केली. अशी माहिती मला दयावी व त्याला हजर करुन घेऊ नये अशी विनंती दिनेश शिरसाठ यांनी गटशिक्षणाधिकारी यांना केली आहे.
चौकट
दिड वर्षांपूर्वी जामखेड व इतर तालुक्यातील शिक्षक, व्यापारी, शेतकरी व इतर नौकरदारांना शेअर्स मार्केटमध्ये मोठ्या पैशाचे अमिष दाखवून जामखेड तालुक्यातील काही शिक्षक एजंटानी मोठ्या प्रमाणावर रकमा गोळा केल्या होत्या. सुरवातीला काही परतावा म्हणून रक्कम दिली. यामुळे अनेकांचा विश्वास बसल्यांतर बॅंकेचे कर्ज काढून, शेती जमीन विकून व सावकाराकडून पैसे घेऊन जादा पैसे गुंतवले होते. सदर आकडा २५ कोटीपेक्षा जास्त आहे. पण पोलिसांकडे फिर्याद देण्यास कोणी येत नव्हते. याबाबत जामखेड येथील एका व्यावसायिकाने शिक्षक बाळासाहेब मोरे यास पैसे देताना चेक घेतला होता. काही काळाने सदर शिक्षक फरार झाल्याने व्यवसायाने चेक बॅंकेत भरला व बाऊन्स झाल्यामुळे न्यायालयात १३८ खाली कारवाई चालू आहे.