जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
तालुक्यातील आपटी येथिल नरसिंग विठोबा मत्रे (वय १०२) यांचे दि. ५ जुलै सोमवारी नगर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये दुखद निधन झाले. हि बातमी पत्नी कोंताबाई नरसिंग मत्रे (वय ९०) यांना समजताच अवघ्या काही तासात त्यांनीही जगाचा निरोप घेतला या दुखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व आपटीचे माजी सरपंच (मुकादम) युवराज मत्रे व श्री साकेश्वर विद्यालयातील सहशिक्षक महादेव मत्रे यांचे ते आई – वडील होत.
त्यांच्या मागे तिन मुले दोन मुली (सर्व विवाहित) सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नगर जिल्हाध्यक्ष महिला कुस्ती मल्लविद्या शिल्पा मत्रे यांचे ते आजोबा आजी आजोबा होते.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ, श्री साकेश्वर विद्यालय साकत तसेच इतर शाखेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.