जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
केलेल्या कामाची प्रसिद्धी मिळाल्याने काम करण्यास अधिक हुरूप येतो व अधिक जोमाने काम करता येते असे मत प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी व्यक्त केले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदी शशिकांत देशमुख तर डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या जामखेड तालुकाउपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ल. ना. होशिंग विद्यालयात सत्कार करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसुळ, ज्येष्ठ शिक्षक उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, पी. टी. गायकवाड,
बी. ए. पारखे, यांच्या सह सर्व स्टाफ उपस्थित होता.
यावेळी बोलताना प्राचार्य होशिंग म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजाचा आरसा म्हणून पाहिले जाते. आपल्या कामाची प्रसिद्धी जगभरात पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे त्यामुळे डिजिटल मिडीयाला सध्या चांगले दिवस आहेत. काही क्षणात सगळीकडे बातमीचा प्रसार होतो यावेळी नूतन सचिव शशिकांत देशमुख व डिजिटल मिडीया उपाध्यक्ष सुदाम वराट यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की, संस्थेच्या चांगल्या कामासाठी व विद्यार्थी विकासाच्या धोरणाला माझे नेहमीच सहकार्य राहील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करू असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी दिली लसुत्रसंचलन अनिल देडे यांनी केले तर आभार संजय कदम यांनी मानले.